वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबडेकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची युती मागच्या आठवड्यात झाल्याचे पत्रकार परिषदेतून जाहीर करण्यात आले. मात्र त्यानंतर दोनच दिवसांत संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात वाकयूद्ध झाल्याचे पाहायला मिळाले. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार हे भाजपाचेच असल्याचे म्हटले होते, त्यावर राऊत यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर आज कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना शरद पवारांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीचे काय चालले आहे, याची माहिती आम्हाला नाही. आम्ही त्या चर्चेत सहभागी नव्हतो, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

हे ही वाचा >> प्रकाश आंबेडकर यांनी शुद्धीवर येऊन बोलावे, राष्ट्रवादी काँग्रेसची वंचितवर जळजळीत टीका

Narendra Modi death threat
“जगभरात मोदींच्या हत्येचा कट”, भाजपाच्या नेत्याचं खळबळजनक विधान; म्हणाले, “मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर…”
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Vijay Wadettiwar criticize dr Prakash Ambedkar in nagpur
“हुंडा न मिळाल्याने लग्न तुटले असावे,” विजय वडेट्टीवार यांची प्रकाश आंबेडकर यांच्यावर खोचक टीका; म्हणाले…
sanjay raut prakash ambedkar (4)
“वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला”, प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर संजय राऊत म्हणाले, “आम्ही आता त्यांना…”

वंचितशी आघाडीबाबतचा प्रस्ताव आमच्यासमोर नाही

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना अशी आघाडीची चर्चा झालेली आहे आणि पुढील निवडणुकीत आम्ही एकत्र सामोरे जाऊ, असे आमचे मत आहे. वंचित बहुजन आघाडीशी युती करण्यासोबत आमच्यासमोर कोणताही प्रस्ताव नाही, त्यामुळे आम्ही त्याची चर्चा करणार नाही. त्यांच्यासोबतच्या आघाडीचा प्रस्ताव आमच्यासमोर नसल्यामुळे कुणाला किती जागा वाटप होणार, यावर चर्चाच होऊ शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी मांडली.

हे वाचा >> “महाविकास आघाडीचा भाग व्हायचं असेल तर…”, शरद पवारांवरील ‘त्या’ विधानावरून प्रकाश आंबेडकरांना संजय राऊतांचा सल्ला

प्रकाश आंबेडकरांच्या त्या वक्तव्याचाही घेतला समाचार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत नाहीत, मी असतो तर तेच केलं असतं. असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. याबाबतचा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना पवार म्हणाले की, कोण काय बोलतं याकडे आम्ही लक्ष देत नाहीत. पण आमचा अनुभव आहे की, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे.

हे वाचा >> वंचित भाजपाची खरंच बी टीम? प्रकाश आंबेडकरांनी नेमकं सांगितलं; म्हणाले, “मी अजूनही…”

प्रकाश आंबेडकर विरुद्ध संजय राऊत

एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत, असे खळबळजनक वक्तव्य केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्याकडून आंबेडकरांवर टीका करण्यात आली होती. त्या टीकेला आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिले. “मला सल्ला देणारे संजय राऊत कोण? माझी युती शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंशी झाली आहे. त्यांचा सल्ला मी ऐकेल. पण इतर कुणी मला सल्ला देऊ नये” अशी जळजळीत टीका आंबेडकर यांनी केली होती. तर आंबेडरांच्या आरोपावर उत्तर देत असताना, “मी कोण हे उद्धव ठाकरे ठरवतील” असा पलटवार संजय राऊत यांनी केला.