जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापुरात राष्ट्रवादीला जबर धक्का

भाजपबरोबर आघाडी करण्याचा निर्णय विनय कोरे यांनी चर्चा करुन घेतला आहे.

ncp, ajit pawar
राष्ट्रवादी काँग्रेस ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

चंदगडच्या राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या कन्या नंदा बाभुळगावकर व राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांचे सुपुत्र, जिल्हा परिषद सदस्य धर्यशील माने  यांनी जिल्हा परिषद निवडणूक भाजपचाच  सहकारी घटक पक्ष म्हणून लढवण्याचा निर्णय रविवारी घेतल्याने राष्ट्रवादीला जबर दणका बसला आहे. पक्षाचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांच्या भूमिकेला तडा गेला आहे. या निर्णयामुळे पक्षात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर  बऱ्याच उलथा – पालथी घडण्याची चिन्हे आहेत.

नंदा बाभुळगावकर व धर्यशील माने  यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आपली भूमिका येथे  पत्रकार परिषदेत मांडली. बाभुळगावकर म्हणाल्या, विधानसभेचे अध्यक्ष कै. बाबा कुपेकर यांच्या पश्चात आई आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी चंदगड या दुर्गम भागातील मतदारसंघाचा विकास चालवला आहे. हे काम मोठे जिकिरीचे असताना केंद्र व राज्य सरकारने विकासकामासाठी मोठे सहकार्य केले.  विकासपर्व पुढे सुरु रहावे यासाठी नवी भूमिका घेतली आहे. चंदगड तालुक्याचा विकास आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एव्हीएच या अतिघातक प्रदूषणकारी प्रकल्पाच्या विरोधात आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे आम्ही भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

धर्यशील माने म्हणाले, जिल्ह्णाातील सर्वात मोठा तालुका असलेल्या हातकणंगले तालुक्यात पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा करून आत्ताच निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यास मान्यता दिली आहे. आमदार हाळवणकर यांच्यासह माने, महाडिक, कोरे गट एकत्रित आल्यास तालुक्याचे प्रश्न मार्गी लागतील.  निवडणुकीत आम्हाला त्याचा फायदा होणार आहे.

पन्हाळा जनसुराज्यसाठी भाजपबरोबर आघाडी करण्याचा निर्णय विनय कोरे यांनी चर्चा करुन घेतला आहे. असे जनसुराज्यचे प्रवक्ते विजयसिंग जाधव यांनी सांगितले. पन्हाळ्यात किती जागा जनसुराज्यला मिळणार, असे विचारले असता सर्वच जागा मिळाव्यात अशी इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कोल्हापूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncp in kolhapur election