scorecardresearch

ईडीची छापेमारी मोठे षडयंत्र; ‘त्या’ चित्रफितीसह हसन मुश्रीफ यांचा सोमय्या यांच्यावर निशाणा

हसन मुश्रीफ यांनी रविवारी एक चित्रफीत समाज माध्यमात अग्रेषित करून ‘आपल्यावरील कारवाई म्हणजे मोठे षडयंत्र आहे, याचा हा धडधडीत पुरावा आहे,’ असे विधान केले आहे.

ईडीची छापेमारी मोठे षडयंत्र; ‘त्या’ चित्रफितीसह हसन मुश्रीफ यांचा सोमय्या यांच्यावर निशाणा
किरीट सोमय्या आणि हसन मुश्रीफ (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी रविवारी एक चित्रफीत समाज माध्यमात अग्रेषित करून ‘आपल्यावरील कारवाई म्हणजे मोठे षडयंत्र आहे, याचा हा धडधडीत पुरावा आहे,’ असे विधान केले आहे. या माध्यमातून मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे.

आणखी वाचा – घोटाळे करताना मुश्रीफांना धर्म का आठवला नाही? भाजप नेते किरीट सोमय्यांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने गेल्या आठवड्यात छापेमारी केली. तेव्हापासून मुश्रीफ – सोमय्या यांच्यात शाब्दिक वाद रंगला आहे. कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया व्यक्त करत मुश्रीफ यांनी या मागे किरीट सोमय्या यांचा हात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच राहिले आहेत. अशातच आज मुश्रीफ यांनी अर्ध्या मिनिटांची चित्रफीत शेअर करीत त्यामध्ये किरीट सोमय्या हे अनाहूतपणे मुश्रीफ यांच्यावरील मोहीम कशा पद्धतीने यशस्वी झाली असल्याचे दाखवून दिले आहे.

आणखी वाचा – हसन मुश्रीफ यांच्या घरावर तब्बल १२ तास छापेमारी! चौकशीत ईडीच्या हाती नेमकं काय लागलं?

नेमके काय म्हणाले ?

मुश्रीफ यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘षडयांत्राचा हा घ्या पुरावा. घरावर छापा सुरू असतानाच किरीट सोमय्या म्हणाले, हसन मुश्रीफच्या घरावर रेड सुरू झाली आहे, दिल्लीवाल्यांनी कमिटमेंट पूर्ण केली.! यावरूनच हे किती मोठे षडयंत्र रचले आहे, याचा हा धडधडीत पुरावा आहे.’ विशेष म्हणजे, भाजप नेते किरीट सोमय्या हे सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत असताना पूर्वसंध्येला मुश्रीफ यांचा हा व्हिडिओ चर्चेत आला असून सोमय्या कोणते उत्तर देणार याचेही कुतूहल आहे.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-01-2023 at 18:39 IST

संबंधित बातम्या