Premium

कोल्हापूर जिल्हा लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची आढावा बैठक, अजित पवारांनी उपटले नेत्यांचे कान; नेमकं काय घडलं?

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूरातून आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील तर हातकणगले मधून जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांचे नाव मंगळवारी मुंबईत झालेल्या पक्षाच्या उच्चस्तरीय बैठकीत पुढे आले आहे.

NCP review meeting for Kolhapur district Lok Sabha election
कोल्हापूर जिल्हा लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची आढावा बैठक

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूरातून आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील तर हातकणगले मधून जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांचे नाव मंगळवारी मुंबईत झालेल्या पक्षाच्या उच्चस्तरीय बैठकीत पुढे आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मतदारसंघ निहाय आढावा मुंबई पक्ष कार्यालयात घेतला. आजच्या बैठकीला ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, के. पी. पाटील, जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर आदींकडून मतदारसंघ निहाय आढावा घेतला.

हेही वाचा >>>“पूर्ण ठाकरे गट असंतुष्ट आहे”, देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर विनायक राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

हातनंगले मतदारसंघासाठी जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांचे एकमेव पुढे आले. ५ वेळा खासदार झालेले दिवंगत उदयसिंगराव गायकवाड यांचे ते नातू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती शैलजादेवी गायकवाड यांचे ते सुपुत्र असल्याने त्यांना चांगले पाठबळ मिळू शकते असा चर्चेचा सूर राहिला.

कोल्हापूर बाबत वादंग

कोल्हापूरसाठी ठाकरे गटात असलेले माजी आमदार संजय घाटगे यांना पक्षात घेवून उमेदवारी द्यावी असे सुचवल्यावर अजित पवार यांनी इतरांची नावे सुचवून आपली जबाबदारी झटकू नका, अशा शब्दात खडसावले. अरुण डोंगळे यांचे नाव पुढे केल्यावर ते किमान पक्षात तरी आहे का; याची तरी खात्री करा, अशा शब्दात समज दिली गेली. यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीतील संभाजीराजे छत्रपती, धनंजय महाडिक यांच्या बाबतीत सोयीस्कर राजकारण केल्याने त्यांना मते कमी पडली होती, याचीही जाणीव नेतृत्वाने करून दिली.

हेही वाचा >>>कोल्हापुरात लाच स्वीकारताना आरोग्य विभागातील सहाय्यक अधीक्षकासह तिघांना रंगेहात पकडले

संघटना बांधणीबाबत नाराजी

कोल्हापूर महापालिकेत ८१ प्रभाग असताना नगरसेवकांची संख्या घटत आहे. मेळाव्याला मोजकेच कार्यकर्ते उपस्थित राहतात. भाजपने प्रशस्त कार्यालय बांधले पण राष्ट्रवादीच्या कार्यालयासाठी स्वतःची एखादी खोलीही मिळू शकत नाही, असे मुद्दे उपस्थित करत अजित पवार यांनी संघटनात्मक बांधणीवर कोरडे ओढले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-05-2023 at 19:32 IST
Next Story
कोल्हापूर: नवपरिणीत दोघा जोडप्यांची महालक्ष्मी, जोतिबावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी