आशियाई युथ वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत निकिता सुनील कमलाकर हिने बुधवारी रौप्यपदकाची कमाई केली. ताश्कंद (कुझबेकिस्तान) येथे सुरू असलेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत निकिताने ५५ किलो वजनी गटात ६८ किलो स्नॅक आणि ९५ किलो क्लीन अँड जर्क असे १६३ किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले.
कुटुंबियांना आनंद
गेल्या महिन्यात मेक्सिको येथे झालेल्या जागतिक अजिंक्य स्पर्धेत तिचे पदक थोडक्यात हुकले होते. आज तिने हे यश मिळवल्यानंतर कमलाकर कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. तिचे वडील तेरवाड (ता. शिरोळ) येथे राहतात. ते एका पायाने अपंग असून चहाचे फिरस्ते विक्रेते आहेत. आई खाजगी रुग्णालयात काम करते. तिच्या यशाने आई-वडिलांसह आजोबांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तिला प्रशिक्षक विजय माळी, विश्वनाथ माळी, निशांत पवार यांनी मार्गदर्शन केले.



