कोल्हापूर : करवीर निवासिनी आई श्री. अंबाबाई देवीच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या पाठबळाने मला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी व्यक्त केली. राज्य शासनाने आज नवीन पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. त्यामध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री पद दीपक केसरकर यांच्याकडून काढून घेतले असून ते हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

हेही वाचा >>> कोल्हापूरचे पालकमंत्रीपद मिळाल्याने हसन मुश्रीफ यांचे स्वप्न अखेर साकार

What will those do as MPs who cannot run factory says Ajit Pawar
ज्यांना कारखाना चालवता येत नाही ते खासदार होऊन काय करणार- अजित पवार
Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
Blood donation by AAP
केजरीवालांच्या समर्थनार्थ कोल्हापुरात आपतर्फे रक्तदान
dhananjay mahadik statment about shoumika mahadik contesting poll from hatkanangale constituency
हातकणंगलेत शौमिका महाडिक यांच्यासाठी लढण्यास तयार – धनंजय महाडिक

राजकीय अभिनिवेशविना काम ही निवड झाल्यानंतर मुश्रीफ म्हणाले, गेल्या ३५ -४०  वर्षांच्या राजकीय व सामाजिक जीवनात ज्या -ज्या संधी मला जनतेने दिल्या, त्या सर्वांच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या या पालकमंत्री पदाच्या माध्यमातूनही जनसेवेच्या रूपाने सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. कोणताही राजकीय अभिनिवेश न आणता कोल्हापूर जिल्ह्याच्या आणि पर्यायाने सर्वच घटकांच्या विकासासाठी मी काम करीन. कार्यकाळ कमी आहे. लोकांच्या माझ्याकडून अपेक्षाही जास्त आहेत,  या सगळ्याची मला जाणीव आहे. त्यासाठी मी कठोर कष्ट घेईन. कोणावरही अन्याय होणार नाही, याची मी काळजी घेईन.

जल्लोष नको

दरम्यान;  नांदेड येथील सरकारी रुग्णालयातील दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जल्लोष करू नये. मी कोल्हापुरात आल्यानंतर मिरवणूकसुद्धा काढू नये. नांदेडमधील त्या दुर्दैवी दुर्घटनेमुळे मी हार -तुरेसुद्धा स्वीकारणार नाही, अशी माझी नम्र विनंती आहे. माझ्यावर आलेल्या या नव्या जबाबदारीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जनतेने मला सहकार्य करावे आणि आशीर्वाद द्यावेत, अशी विनंती मुश्रीफ यांनी केली आहे.