कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने गेल्या तीन वर्षांमधील सर्वोत्तम कामगिरी गतवर्षी (२०२१) केली असून वर्षभरात ५ हजार ६८५ गुन्हे दाखल झाले असताना ५ हजार ६७३ गुन्हे उघडकीस आणले. तब्बल ९९ टक्के गुन्हे उघडकीसचे प्रमाण आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, सन २०२१ मध्ये संघटीत गुन्हेगारी अंतर्गत करणाऱ्या इचलकरंजी येथील खंडेलवाल, शाम पुनिया, महेश दळवी, जर्मन, सुदर्शन, कोल्हापूरमधील आर.सी., भास्कर आदी ८ टोळय़ांवर कारवाई करून ६० पैकी ५०आरोपींना अटक केली. ८१ समाजकंटकांवर हद्दपारीची कारवाई केली. एकूण ३ हजार ६१३ गुन्हे उघड झाले असून ७ कोटी ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

१ कोटीचे दागिने परत

fir against power company team over extortion money
मीटरमध्ये गडबडीच्या नावावर विद्युत महामंडळाचा अभियंताच मागत होता लाच….अखेर पाठलाग करून….
survey of disabled in maharashtra,
राज्यात अपंगांच्या सर्वेक्षणाला तीस वर्षांनंतर मिळाला मुहूर्त
Eknath Shindes Shiv Senas claim on Bhiwandi Lok Sabha
भिवंडी लोकसभेवर शिंदेच्या शिवसेनेचा दावा, कल्याणचे पडसाद भिवंडीत
Ramdas Athawale
महायुतीमध्ये आम्ही नाराज, पुढील तीन दिवसांत निर्णय घेऊ, रामदास आठवलेंचा इशारा

 वर्षभरात २७४१ ग्रॅमचे ९४ लाख १४ हजार रुपयांचे सोन्याचे तर ९७७.९७९ ग्रॅम वजनाचे १५ लाख ५ हजार रुपयांचे चांदीचे असे १ कोटी ९ लाख रुपये किमतीचे दागिने फिर्यादींना परत देण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तसेच पोलीस ठाण्यांतर्गत कार्यरत असणाऱ्या गुन्हे अन्वेषण पथकाने गुन्हे उकल चांगल्या प्रकारे केल्याने ७ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले असल्याची माहिती बलकवडे यांनी दिली.

तेलनाडे, कोराणे गय नाही

मोक्काअंतर्गत कारवाई झाल्यापासून फरारी असलेला भूमाफिया संजय तेलनाडे याला अटक केली असून त्याचा भाऊ सुनील तेलनाडे याचा शोध सुरू आहे. सम्राट कोराणे याचाही शोध घेण्याचे काम सुरू आहे. अशा गुन्हेगारांशी संबंध ठेवून मदत करणारे खात्यातील असो किवा बाहेरील त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.