लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातच्या विविध भागात मंगळवारी पाऊस पडला. काही ठिकाणी हलका तर कोठे मध्यम स्वरूपाचा पाऊस होता. पाऊस कमी झाला आहे तेथे पेरणीची धांदल उडाली असल्याने गावगाड्यात लगबग वाढली आहे.

पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. या आठवड्यात सतत पाऊस पडत आहे. आजही जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये चांगला पाऊस पडला. पाणलोट क्षेत्रात गेले काही दिवस मुसळधार पाऊस सुरू होता. आज या भागात हलक्या सरी कोसळल्या. गगनबावडा, शाहूवाडी, भुदरगड येथे सकाळी काही काळ तुरळक पाऊस झाला. दुपारनंतर उघडीत राहिली. शिरोळ येथे सायंकाळी अर्धा तास दमदार पाऊस पडला. शासकीय कामासाठी आलेल्या कार्यालयात अडकून पडले.

आणखी वाचा-कोल्हापूर महापालिकेची कामे संथगतीने; पण बदनामी शासनाची – राजेश क्षीरसागर

आधुनिक पद्धतीने पेरणी

पावसाची गती पाहून भात, सोयाबीन, भुईमूग पिकाच्या पेरणीला वेग आला आहे. ऊस पिकासाठी ही पाऊस पोषक ठरत आहे. शेतकरी महिला पारंपारिक गाणी गुणगुणत पेरणीच्या कामात व्यस्त आहेत. आधुनिक पद्धतीने पेरणी करण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.