आज वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने राज्यस्तरीय साखर परिषद 2022 च्या कार्यक्रमाचे उद्घानट करण्यात आले. या उद्घाटनाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी साखर कारखानदारी, ऊस तोडणी, शेतकऱ्यांच्या समस्या यावर सविस्तर भाष्य केले. मात्र दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नितीन गडकरी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली असून शरद पवार यांच्यावर सडेतोड टीका केली आहे. “नितीन गडकरी यांच्या धोरणामुळे साखरेचे उत्पादन 22 टक्के कमी होऊन इथेनॉलचे उत्पादन वाढले. मात्र हेच धोरण दहा वर्षे कृषीमंत्री असताना शरद पवार यांना का राबवता आले नाही? असा सवाल त्यांनी केला आहे. ते सोलापूरमध्ये बोलत होते.

हेही वाचा >>> धनंजय मुंडे यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठे विधान, म्हणाले “आपलाच…”

“गडकरी हे कौतुकास पात्र आहेतच मात्र शरद पवार हे कृषीमंत्री होते. साखर कारखानदारांचे मंत्री होते. नितीन गडकरी यांच्या धोरणामुळे साखरेचे उत्पादन 22 टक्के कमी होऊन इथेनॉलचे उत्पादन वाढले. मात्र हेच धोरण दहा वर्षे कृषीमंत्री असताना शरद पवार यांना का राबवता आले नाही? याचे आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे,” असे राजू शेट्टी म्हणाले.

हेही वाचा >>> जम्मूपासून विदर्भापर्यंत उष्णतेची लाट; पूर्वोत्तर राज्ये, दक्षिणेकडे मोसमी पावसाची हजेरी

तसेच, “सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणे पवार साहेब साळसूदपणे शेतकऱ्यांना सांगतात की, साखर कारखान्यामध्ये साखर शिल्लक राहिल्यामुळे त्याच्यावर जे कर्ज काढले जाते. त्याच्या व्याजाचा बोजा हा कारखान्यावर पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी तुकड्यातुकड्याने पैसे घ्यावे, असे साळसूदपणे सल्ला देतात. अठरा वीस महिने शेतकऱ्यांचा ऊस शेतात उभा असतो. एवढे महिने शेतकऱ्यांचे पैसे त्यात गुंतलेले असतात. त्याचे व्याज त्यावर चालू असते. याचा विचार केला जात नाही,” असेही शेट्टी म्हणाले.

हेही वाचा >>> … परंतु, सध्याचे राज्यकर्ते हे सभ्य आणि सुसंस्कृत नाहीत – शरद पवार

“साखरेच्या व्याजावरचा मुद्दा शरद पवार यांना भेडसावत असेल तर तर ते दहा वर्षे कृषीमंत्री होते. १० वर्षे नाबार्ड त्यांच्या हाताखाली होती. नाबार्डही त्यांच्या इशाऱ्यावर काम करत होती. नाबार्डकडे निधीची कमतरता नाही. नाबार्डला साखर उद्योगाला साखरेवर उचल किंवा कर्ज देता आले असते. डेरी उद्योगाला देतात तसे. त्यामुळे साखर उद्योगाला जिल्हा बॅंक किंवा राज्य सहकारी बॅंकेकडून 13 टक्क्याने कर्ज घ्यावे लागले नसते. ते अवघ्या 2 टक्क्याने मिळाले असते आणि साखर कारखाने अडचणीत सापडले नसते,” असेही राजू शेट्टी म्हणाले.

हेही वाचा >>>धनंजय मुंडेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांची खास प्रतिक्रिया, म्हणाल्या “सध्या उद्धव ठाकरे…”

तसेच पुढे बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले, “शरद पवारांनी कृषीमंत्री असताना नाबार्ड कडून कर्ज दिले नाही कारण जिल्हा बॅंक आणि राज्य बॅंकातील बगलबच्चे पोसायचे होते. साखर उद्योगातून 3 हजार कोटी रुपयांचे व्याज मिळते त्यावर ही बांडगुळे पोसली जातात. शरद पवारांनी शेतकऱ्यांचे हीत न पाहता बांडगुळांना पोसण्याचे काम केले,” असे राजू शेट्टी म्हणाले.