सत्तेत कोणी आले तरी काठी पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या पाठीत घालतात, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली. कांद्याच्या दर घसरले असल्याने राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जुगलबंदी सुरू आहे. याच मुद्द्यावरून राजू शेट्टी यांनी बुधवारी एका ट्विटद्वारे आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

हेही वाचा >>> कोल्हापूर : महालक्ष्मी एक्स्प्रेस सात तास उशिरा; प्रवाशांची संतप्त प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचे पाहून समाधान वाटले. पण हेच विरोधी पक्ष जेव्हा सत्तेत होते तेव्हा भूमीअधिग्रहण दोन टप्प्यातील एफआरपी यासारखे शेतकऱ्यांच्या संसारावर वरवंटा फिरवणारी निर्णय घेताना यांच्यातील शेतकरी प्रेम विधीमंडळाच्या कोणत्या खुंटीला टांगले होते? तेव्हा आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षात असताना या प्रश्नावर सभागृहात गोंधळ घातला आणि सत्तेत आल्यावर निर्णय घेण्याची वेळ आल्यानंतर मूग गिळून गप्प का आहेत? शेतकऱ्यांनो राज्यातील विरोधी पक्ष सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांचा काठी म्हणून वापर करतात आणि सत्तेत आल्यानंतर तीच काठी पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या पाठीत घालतात.