कोल्हापूर : राधानगरी धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजाशेजारी असलेल्या लोखंडी वाहिनीवर दुर्मीळ ‘चापडा’ जातीचा विषारी साप धरण पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना आढळून आला.

विशेष म्हणजे हा साप केवळ पूर्व आणि पश्चिम घाट परिसरामध्ये आढळतो. घोणस, फुरसे यांचा जातबाही असलेला चापडा हिरवा घोणस म्हणूनही ओळखला जातो. इंग्रजीमध्ये याला बांबूपीठ व्हायपर असेही म्हणतात. हा साप तसे रागीट, चिडखोर तसेच अत्यंत आक्रमक आणि चपळ असतो. तो जंगल आणि डोंगराळ भागात लहान झुडपांच्या फांद्यावर, वेलीवर राहतो. बांबूंच्या वनात हा साप हमखास पाहायला मिळतो.

how does hail fall marathi news, how does hail fall in summer marathi news
विश्लेषण: गारांचा पाऊस कडक उन्हाळ्यात कसा पडतो? हिमवर्षाव आणि गारपिटीमध्ये काय फरक?
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा
South Mumbai Redevelopment plans
आमचा प्रश्न दक्षिण मुंबई : नियोजनाअभावी रखडलेल्या ‘झोपु’ योजना

भारतामध्ये अनेक ठिकाणी आढळणारा हा साप त्या त्या भागानुसार विविध रंगात आणि आकारात पाहायला मिळतो. पोपटी, हिरवा, शेवाळी हिरवट, पिवळय़ा रंगांमध्ये याची संपूर्ण पाठ असते. पोटाचा खालचा भाग पिवळय़ा रंगाचा असतो. एक तासानंतर हा साप धरणाशेजारील जंगल क्षेत्रात गेला असल्याचे पर्यटकांनी सांगितले.