rare venenose snake found at the radhanagari dam site zws 70 | Loksatta

राधानगरी धरण स्थळावर दुर्मीळ चापडा साप आढळला

भारतामध्ये अनेक ठिकाणी आढळणारा हा साप त्या त्या भागानुसार विविध रंगात आणि आकारात पाहायला मिळतो.

राधानगरी धरण स्थळावर दुर्मीळ चापडा साप आढळला
राधानगरी धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजाशेजारी असलेल्या लोखंडी वाहिनीवर दुर्मीळ ‘चापडा’ जातीचा विषारी साप धरण पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना आढळून आला.

कोल्हापूर : राधानगरी धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजाशेजारी असलेल्या लोखंडी वाहिनीवर दुर्मीळ ‘चापडा’ जातीचा विषारी साप धरण पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना आढळून आला.

विशेष म्हणजे हा साप केवळ पूर्व आणि पश्चिम घाट परिसरामध्ये आढळतो. घोणस, फुरसे यांचा जातबाही असलेला चापडा हिरवा घोणस म्हणूनही ओळखला जातो. इंग्रजीमध्ये याला बांबूपीठ व्हायपर असेही म्हणतात. हा साप तसे रागीट, चिडखोर तसेच अत्यंत आक्रमक आणि चपळ असतो. तो जंगल आणि डोंगराळ भागात लहान झुडपांच्या फांद्यावर, वेलीवर राहतो. बांबूंच्या वनात हा साप हमखास पाहायला मिळतो.

भारतामध्ये अनेक ठिकाणी आढळणारा हा साप त्या त्या भागानुसार विविध रंगात आणि आकारात पाहायला मिळतो. पोपटी, हिरवा, शेवाळी हिरवट, पिवळय़ा रंगांमध्ये याची संपूर्ण पाठ असते. पोटाचा खालचा भाग पिवळय़ा रंगाचा असतो. एक तासानंतर हा साप धरणाशेजारील जंगल क्षेत्रात गेला असल्याचे पर्यटकांनी सांगितले.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
कोल्‍हापूर प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेचा आखाडा ; धक्काबुक्की, वादावादीने गालबोट

संबंधित बातम्या

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीपुढे सक्षम कारभाराचे आव्हान
पश्चिम घाटातील पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात घट?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
रेल्वे रुळांवर फेकलेले साहित्य गोळा करायला गेलेल्या भाजीविक्रेत्याला रेल्वेने दिली धडक, दोन्ही पाय निकामी
काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये आलेल्या जयवीर शेरगील यांना मिळाली राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी!
“…तर गंभीर परिणाम भोगावे लागतील”, ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून संभाजीराजेंचा ‘झी स्टुडिओ’ला इशारा!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांचा छत्रपती संभाजीराजेंच्या समाधिस्थानी आत्मक्लेश
Delhi Riots 2020 : दिल्ली दंगल खटल्यात उमर खालिद आणि खालिद सैफीची निर्दोष मुक्तता