पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील श्री तुळजाभवानी मंदिरात  सोमवारी चोरी झाली.  चोरट्यांनी देवीच्या अंगावरील दागिने लंपास केले. दानपोटी फोडून त्यातील अडीच लाख रुपये लांबवले. पट्टणकोडोली येथे मराठा कॉलनीमध्ये श्री तुळजाभवानी मंदिर आहे. मंदिराच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून चोरट्यानी आत मध्ये प्रवेश केला. त्यांनी  देवीचा चांदीचा मुकुट, कमरपट्टा, मंगळसूत्र आदी  दागिनेलंपास केले. 

हेही वाचा >>> कोल्हापूर भाजपमधील वाद शिगेला, जिल्ह्यातील नेत्यांसमोर कटुता मिटविण्याचे आव्हान

दानपेटीतीळ रक्कम त्यांनी पळवून नेली. मंदिरातील पुजारी जयसिंग दळवी हे पहाटे मंदिरात आल्यावर हा प्रकार निदर्शनास आला. हुपरी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.  परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. पट्टणकोडोली परिसरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले असताना चोरट्यांनी मंदिराकडेही मोर्चा वळवला आहे.

Story img Loader