कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या पहिल्या महापौर पदाचा मान एका महिलेला मिळणार आहेत. महापौरपदी रुपाराणी निकम यांना संधी देण्यात येणार असल्याची घोषणा सोमवारी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. निकम या कोल्हापूर भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष आहेत. यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर महापालिकेत महिला राज्य पुढेही सुरू राहणार असल्याचे अधोरेखित झाले. कोल्हापूर महापालिकेत महायुतीने सत्ता काबीज केल्यानंतर महापौर पदासाठी भाजप – शिवसेनेमध्ये चुरस सुरू होती. शनिवारी एका बैठकीमध्ये पहिले महापौर पद भाजपकडे सोपवण्याचा निर्णय झाला. हे पद दहा महिन्यासाठी असणार आहे.
बैठकीत महापौर पद दहा महिन्यांचे करण्याचे ठरले. पहिली संधी भाजपला मिळणार आहे. यासाठी भाजप मधून विजयसिंह खाडे पाटील, वैभव कुंभार, विशाल शिराळे, रिंकू उर्फ विजय देसाई, प्रमोद देसाई, रूपाराणी निकम आदींची नावे निश्चित झाली होती ही नावे भाजपच्या प्रदेश कार्यालयाकडे पाठवली जाणार होती. तेथे नावावर शिक्कामोर्तब होणार होते. आज भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हा कार्यालयात पार पडली. बैठकीस वैद्यकीय शिक्षण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, महेश जाधव, राहुल चिकोडे, विजय जाधव, प्रा. जयंत पाटील उपस्थित होते.
या बैठकीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापौर पदाचे पहिले संधी रुपात आणि निकम यांना देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. कोल्हापूर महापालिकेचे ८१ जागांसाठी निवडणूक झाली. त्यामध्ये महायुतीने सर्वाधिक ४६ जागा त्या आहेत. तिकडे बहुमत असल्याने महापौर निवडीमध्ये अडचण येण्याची शक्यता दिसत नाही. यामुळे रूपाराणी निकम यांची महापौर पदी निवड निश्चित मानली जात आहे.
कोण आहेत निकम?
रूपा राणी निकम या भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात त्या महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग १८ क मधून निवडून आले आहेत त्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आहेत महापालिकेमध्ये स्थायी शिक्षण महिला व बालकल्याण या समितीमध्ये त्यांनी काम पाहिले आहे त्यांच्या कार्यक्षम कार्यकर्त्या संधी मिळाल्याने त्याचे भाजप कार्यकर्त्यांकडून तसेच नागरिकांकडून स्वागत होत आहे.
महिलाराज कायम
कोल्हापूर महापालिकेत मागील सभागृहा पूर्वी सलग दहा वर्ष महिला महापौर होते. अनेक महिला नगरसेविकांना महापौर होण्याची संधी मिळाली होती. यावेळचे महापौर पद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यासाठी काही नगरसेवकांनी लॉबिंग सुरू केले होते. परंतु भाजपच्या वरिष्ठांनी एका प्रामाणिक कार्यकर्त्या महिलेला संधी दिल्याने महापालिकेतील महिला राज कायम राहणार आहे.

