scorecardresearch

संभाजीराजे छत्रपती यांना ; पोलंड सरकारचा पुरस्कार प्रदान

खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांना पोलंड देशाकडून ‘बेणे मेरितो’ पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले.

कोल्हापूर : खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांना पोलंड देशाकडून ‘बेणे मेरितो’ पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले. पोलंड देशाच्या नागरिकांना अथवा पोलंड देशाला सहकार्य केलेल्या इतर देशातील नागरिकांना पोलंड देशाच्या परराष्ट्र मंत्रालयामार्फत हा पुरस्कार दिला जातो.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान पोलंडच्या ५ हजार निर्वासित नागरिकांसाठी कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने वळीवडे येथे मोठा कॅम्प (वसाहत) उभारला होता. २०१९ साली या घटनेस ७० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घेऊन या कॅम्पमध्ये राहिलेल्यांपैकी हयात नागरिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना ‘राज्य अतिथी’ म्हणून निमंत्रित करून वळीवडे पोलंड
कॅम्पच्या स्मृती जगविण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दोन्ही राष्ट्रांमधील हा ऐतिहासिक बंध पुन्हा जोपासण्यासाठी संभाजीराजे यांनी केलेल्या प्रयत्नांचा गौरव करण्यासाठी आणि त्यामाध्यमातून कोल्हापूरच्या जनतेचाही सन्मान करण्यासाठी पोलंडचे परराष्ट्र मंत्री झ्बिग्नीव राऊ यांच्या हस्ते हा पुरस्कार दिल्ली येथील पोलंड दूतावासात त्यांना प्रदान करण्यात आला.
पोलंडचे परराष्ट्र मंत्री झ्बिग्नीव राऊ यांच्या हस्ते युवराज संभाजीराजे छत्रपती यांना ‘बेणे मेरितो’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sambhaji raje chhatrapati awarded government poland mp bene marito amy

ताज्या बातम्या