scorecardresearch

समीर गायकवाडच्या पोलिस कोठडीत वाढ

विशेष अभियोक्ता चंद्रकांत बोदले यांनी पोलिस तपास दरम्यान उपलब्ध झालेली माहिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

समीर गायकवाडच्या पोलिस कोठडीत वाढ

कॉ.गोिवद पानसरे खून प्रकरणातील संशयित आरोपी सनातन संस्थेचा समीर गायकवाड याच्या पोलिस कोठडीत बुधवारी आणखी तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.येथे सरकारी पक्ष व बचाव पक्ष यांचा तासाहून अधिक काळ चाललेला युक्तिवाद ऐकून घेऊन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.के.दैनापुरे यांनी हा निर्णय दिला.

विशेष अभियोक्ता चंद्रकांत बोदले यांनी पोलिस तपास दरम्यान उपलब्ध झालेली माहिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. गायकवाड याच्या घरावर छापा टाकला असता २३ मोबाइल व काही सिमकार्डे जप्त करण्यात आली. त्यातील संभाषण तपासून पाहिले असता गायकवाड व ज्योती कांबळे यांच्यात पानसरे खुनासंदर्भातील काही धागेदोरे मिळालेले आहेत. गायकवाडने बहीण अंजली हिच्याशी केलेल्या संभाषणादरम्यानही खुनासंदर्भातील माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. या बाबी पाहता पोलिस तपास पथकाला अधिक सखोल तपास करण्याची गरज असल्याने गायकवाड याच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. दुसरीकडे गायकवाड याच्या बचावासाठी वकिलांची मोठी फौज उपस्थित होती.

बंदीस नकार
पणजी:‘सनातन’वर बंदी घालण्याची शक्यता गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी फेटाळली आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-09-2015 at 05:02 IST

संबंधित बातम्या