सांगली : एकतफी प्रेमातून प्रेमाची भीक मागणार्या युवकाच्या सततच्या त्रासास कंटाळून एका युवतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सावंतपूर (ता. पलूस) येथे घडली. या प्रकरणी तरूणींच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार प्रेमवीर तरूणाला पोलीसांनी अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी, कोल्हापूरमध्ये खासगी नोकरी करत असलेला तरूण सावंतपूरमध्ये वास्तव्य असलेल्या पिडीत तरूणीला वारंवार मोबाईलवर संदेश पाठवून तर कधी फोन करून संपर्क साधत होता. यावेळी माझे तुझ्यावर प्रेम आहे, तूही माझ्यावर प्रेम कर अशी वारंवार विनंती करत होता. या सततच्या संदेशामुळे आणि फोनमुळे होणार्या त्रासास कंटाळून तरूणींने राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली. या प्रकरणी तक्रार दाखल होताच संशयित तरूणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
