सांगली : पारधी वस्तीची झाडाझडती घेऊन पोलीसांच्या पथकाने खून, दरोडा, जबरी चोरीच्या घटनेतील तीन संशयितांना अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी शनिवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.

श्री. दोषी यांनी सांगितले, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाणे हद्दीत लिंगनूर (ता. मिरज) येथील पारधी वस्तीवर आज सकाळी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. सकाळी साडेसहा वाजता लिंगनूर पारधी वस्ती येथे घेण्यात आलेल्या झाडाझडतीमध्ये दरोडा, जबरी चोरी, बलात्कार वासारख्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी नामे सिराज ऊर्फ किरण शिसफुल भोसले (वय २४, रा. आंबेडकरनगर बोलवाड ता. मिरज), विश्वजीत शिसफुल भोसले (वय २१ वर्षे रा. लिंगनूर ता. मिरज) आणि क्रांति जलवा भोसले (वय २० वर्षे रा. लिंगनूर ता. मिरज) या तिघांना ताब्यात घेण्यात आले.

सिराज ऊर्फ किरण भोसले याच्यावर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात खून, दरोडा, जबरी चोरी, बलात्कार यासारखे ९ गुन्हे दाखल आहेत. तसेच कवठेमहंकाळ पोलीस ठाण्यात दरोड्याचा १ गुन्हा असे एकूण १० गुन्हे दाखल असून तो फरार होता. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता दि. ६ मे अखेर आली पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने मंजूर दिले आहेत.

विश्वजीत भोसले याच्या विरोधात मिरज शहर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल असून तो परागंदा होता. तर तिसरा संशयित क्रांति भोसले याच्या विरूध्द कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.

पोलीस निरीक्षक श्री. वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग मुंढे, पुनम मगदुम, अझर मुलाणी, प्रविण यादव, रावसाहेब सुतार, हेमंत ओमासे, शशिकांत जाधव, अमोल ढोले, मिथुन मंगधर, राजेंद्र बाबर, मधुकर मदवान, भारत पवार, विकास भोसले, महिला पोलीस अंमलदार सुनंदा लोहार, अफसाना मुलाणी, दिपाली माळी, अपर्णा जाधव, दिपाली केंद्रे आदींच्या पथकाने केली.