Sangli ZP Election 2017 Winner List: सांगली जिल्हा परिषदेच्या ६१ गटांसाठी आज (शनिवार, ७ फेब्रुवारी) मतदान पार पडणार आहे. २०१७ निवडणुकीतील राजकीय समीकरणे आणि सध्याची बदललेली परिस्थिती पाहता, यावेळची लढत अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. गेल्या वेळेस सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्या पक्षाने बाजी मारली होती आणि इतर कोणता पक्ष किती यशस्वी ठरला होता याचा आढावा आपण घेणार आहोत. चला जाणून घेऊ २०१७ च्या सांगली जिल्हा परिषद निवडणुकीचा पक्षनिहाय निकाल…
२०१७ साली काय निकाल लागला होता?
२०१७ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठी मुसंडी मारत सत्ता हस्तगत केली होती. भारतीय जनता पक्षाला २०१७ च्या निवडणुकीत २५ जागांवर यश मिळाले होते. तर त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस १७ जागा, काँग्रेसला ७ जागा, शिवसेना ३ आणि इतर पक्ष तसेच अपक्ष यांना ८ जागांवर यश मिळाले होते. २०१७ च्या निवडणुकीनंतर संग्रामसिंह देशमुख (भाजपा) यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून, तर सुहास अनिलराव बाबर (शिवसेना) यांनी उपाध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला होता.
२०१७ साली सांगली जिल्हा परिषदेत कोण किती जागा जिंकल्या होत्या?
| पक्ष | जिंकलेल्या जागा |
| भाजपा | २५ |
| राष्ट्रवादी | १७ |
| इतर | ८ |
| काँग्रेस | ७ |
| शिवसेना | ३ |
| एकूण | ६० |
२०१७ मध्ये भाजपा सर्वाधिक २५ जागा जिंकून पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला होता. भाजपाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या वर्चस्वाला जोरदार हजरा दिला होता. भाजपा २०१७ साली मिळवलेले यश पुन्हा राखू शकणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान यंदा राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमधील बदललेल्या समीकरणामुळे यंदा मतदार कुणाला कौल देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कारण २०१७ च्या निवडणुकी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र होते. म्हणजेच या दोन्ही पक्षात सध्या आहे तशी फूट पडलेली नव्हती. या फुटीचा परिणाम राजकीय समीकरणांवर पडणार हे निश्चित आहे.
९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी
जिल्हा परिषदेसाठी आज मतदान पार पडेल आणि ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी करण्यात येणार येईल. जिल्ह्यात २ हजार ३९ मतदान केंद्रांवर मतदान पार पडणार आहे. १८ लाख १८ हजार ७४२ मतदार आपले प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान करणार आहेत. जिल्हा प्रशासनाने मतदानाची जय्यत तयारी केली असून मतदान प्रक्रिया सुरूळीत पार पडावी यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या ६१ गटात आणि दहा पंचायत समितीच्या १२२ गणामध्ये शनिवारी मतदान होईल. यामध्ये सुमारे १८ लाख मतदारांसाठी २ हजार ३९ केंद्रावर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी ८ हजार ९७९ कर्मचारी आणि २४८ विभाग प्रमुख यांची नियुक्त करण्यात आली आहे.

