Sangli ZP Election Winner List 2026: सोलापूर जिल्ह्यातील ६१ जिल्हा परिषद आणि १२२ पंचायत समितीच्या जागांसाठी शनिवारी मतदान पार पडले. तब्बल ६९.७६ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली. जिल्हा परिषदेच्या ६१ जागांसाठी २११ उमेदवार तर पंचायत समितीच्या १२२ जागांसाठी ३४० उमेदवार रिंगणात होते. झेडपीसाठी ११६ पुरूष तर ९५ महिला उमेदवार निवडणूक लढवत होते.

सत्तास्थापनेसाठी अटीतटीची लढाई

सांगली जिल्हा परिषदेतील ६१ पैकी ५९ जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे १७ उमेदवार विजयी झाले आहेत. तर काँग्रेसचे ११ उमेदवार विजयी झाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा एक उमेदवार विजयी झाला आहे. यामुळे महाविकास आघाडीची संख्या २९ वर पोहोचली आहे.

आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, भाजपाने १६ जागांवर विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला ५ जागांवर विजय मिळाला आहे. शिवसेनेला (शिंदे) ७ ठिकाणी विजय मिळवण्यात यश आले आहे. जनसुराज्यला एक जागा मिळाल्यामुळे महायुतीचे एकत्रित संख्याबळ २९ होत आहे.

२०१७ च्या निवडणुकीचा निकाल काय होता?

२०१७ साली झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत सांगली जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्ष (BJP) पक्षाचे वर्चस्व राहिले होते. या निवडणुकीनंतर संग्राम सिंह देशमुख यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली, तर उपाध्यक्षपदी शिवसेना (SHS) पक्षाचे सुहास अनिलराव बाबर यांची वर्णी लागली होती.

सांगली जिल्हा परिषद पक्षीय बलाबल (२०२६)

भाजप – १८

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ७

काँग्रेस – ११

शिवसेना (शिंदे) – ७

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – १५

शिवसेना (ठाकरे) – १

जनसुराज्य – १

रयत क्रांती (सदाभाऊ खोत) – १

एकूण जागा – ६१

जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयी उमेदवार

निवडणूक विभागाचे नाव – निवडून आलेल्या सभासदाचे नाव – पक्ष

१) दिघंची – पृथ्वीराज तानाजी पाटील – शिवसेना
२) करगणी – विनायक मारुती मासाळ – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
३) निंबवडे – पडळकर माधवी ब्रह्मदेव – भारतीय जनता पार्टी<br>४) खरसुंडी – जयदीप मोहनराव भोसले – शिवसेना
५) जाडरबोबलाद – रवि सावित्री तम्मणगोंडा – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
६) उमदी – यलगोंडा आमसिद्धा तोरणे – भारतीय जनता पार्टी
७) संख – कविता किरण पाटील – भारतीय जनता पार्टी
८) दरीबडची – पाटील सरदार संपतराव – भारतीय जनता पार्टी
९) मुंचंडी – देवर्षी रमेश गंगण्णा – भारतीय जनता पार्टी
१०) बनाळी – सुनील रावसाहेब पवार – भारतीय जनता पार्टी
११) शेगाव – शिवाजी अशोक खिलारे – भारतीय जनता पार्टी
१२) डफळापूर – स्वप्नाली मनोज मासाळ – भारतीय जनता पार्टी
१३) विळूर – जिवाणावर शिल्पा रविकुमार – भारतीय जनता पार्टी
१४) नागनाथनगर (नागेवाडी) – डॉ. शीतल अमोल बाबर – शिवसेना
१५) लेंगरे – मनिषा प्रकाश बागल – शिवसेना
१६) करंजे – अॅड. सई आशिषकुमार शिंदे – शिवसेना
१७) भाळवणी – हिम्मत बाजीराव जाधव – शिवसेना
१८) तडसर – वैशाली संभाजी मुळीक – इंडियन नॅशनल काँग्रेस
१९) कडेपूर – कुंभार विद्या शिवाजी – इंडियन नॅशनल काँग्रेस
२०) वांगी – प्रियांका अमोल महाडिक – इंडियन नॅशनल काँग्रेस
२१) देवराष्ट्रे – आशा प्रमोद गावडे – इंडियन नॅशनल काँग्रेस
२२) मांजर्डे – मोहन (नाना) उत्तम पाटील – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
२३) सावळज – अॅड. विजय विश्वास धेंडे – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
२४) विसापूर – अर्जुन (बापू) जनार्दन पाटील – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
२५) येळवी – अमित उर्फ विशाल विजयराव पाटील – इंडियन नॅशनल काँग्रेस
२६) चिंचणी – अविराज उर्फ अक्षय अजयराव पाटील – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
२७) मणेरजुरी – शशिकांत नारायण जमदाडे – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
२८) ढालगाव – विकास चंद्रकांत हाकके – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
२९) कुची – दादासो नारायण कोळेकर – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
३०) देशिंग – श्रीमती सुजाता निवास पाटील – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
३१) रांजणी – संजय निवृत्ती बनसोडे – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
३२) कुंडल – ऋषिकेश महेंद्र लाड – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३३) दुधोंडी – वर्षा शिवाजी जाधव – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३४) अंकलखोप – सुदीप दर्याप्पा गडदे – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३५) भिलवडी – प्रतीक संग्राम पाटील – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३६) रेठरे हरनाक्ष – श्रीमती प्रतिमा सुजित मोरे – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
३७) बोरगाव – श्रीमती कांता शिवाजी वाटेगावकर (माई) – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
३८) कारसगाव – श्रीमती संगिता संभाजीराव पाटील – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
३९) वाटेगाव – श्रीमती संध्या आनंदराव पाटील – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
४०) पेठ – श्रीमती मंदा भगवान माळी – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
४१) वाळवा – संताजी रघुनाथ मेटकरी – शिवसेना
४२) कामेरी – जयराज चंद्रकांत पाटील – भारतीय जनता पार्टी
४३) चिकुर्डे – अभिजित शिवाजीराव पाटील – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
४४) बावची – धैर्यशील मानसिंग धोरात – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
४५) बागणी – श्रीमती मोहिनी सागर खोत – रयत क्रांती पक्ष
४६) येळूर – श्रीमती देविका भोजराज राजेघोरपडे – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
४७) पाणुंब्रे तर्फ वारूण तर्फ वाळवा – शैला शंकर मोहिते – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
४८) वाकुर्डे बुद्रुक – नाईक राजेश्वरी रणधीर – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
४९) कोकरूड – देशमुख साईतेजस्वी सत्यजित – जनसुराज्य शक्ती
५०) मांगले – विराज मानसिंग नाईक – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
५१) भोसे – आशीष जयवंत जाधव – भारतीय जनता पार्टी
५२) एरंडोली – स्नेहल उमेश मोरे – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
५३) आरग – शोभा वसंत खोत – भारतीय जनता पार्टी
५४) बेडग – होनमोरे अ‍स्मिता बाळासाहेब – भारतीय जनता पार्टी
५५) मालगाव – श्रीमती कांबळे दिपाली श्रीकांत – भारतीय जनता पार्टी
५६) कवठलापूर – कांबळे मंजुश्री प्रल्हाद – भारतीय जनता पार्टी
५७) बुधगाव – एडके पूजा रोहन – इंडियन नॅशनल काँग्रेस
५८) कसबे डिग्रज – अवधूत प्रशांत सुकुमार – इंडियन नॅशनल काँग्रेस
५९) कवठेपिरान – पाटील मिना सचिन – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
६०) समडोळी – अरविंद गोविंद तांबवेकर – भारतीय जनता पार्टी
६१) रेहाळ (एस) – कांबळे वर्षा सचिन – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार