कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला जिल्ह्यातील आणखी एका बड्या नेत्याने विरोध केला आहे. लोकसभेचे महायुतीचे उमेदवार, शिंदेसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक, पक्षाचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन सादर केले. 

 नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध वाढत चालला आहे. याची दखल घेऊन याचा निवडणुकीत फटका बसलेले संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शक्तिपीठ महामार्ग तत्काळ रदद करण्याची मागणी केली. शिंदे यांनी याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी यांना दिल्या.

हेही वाचा >>>कोल्हापुरात आढळला दुर्मिळ स्पॉटेड वूल्फ स्नेक

महामार्गामध्ये संपादित होणाऱ्या जमिनीमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्याकडे उपजिवीकेसाठी जमिन शिल्लक रहाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध लक्षात घेता हा महामार्ग तत्काळ रद्द करणे गरजेचे आहे, असेमंडलिक यांनी निवेदनात म्हटले आहे.