scorecardresearch

आंदोलन मागे घेण्यास सराफांचा नकार

कोल्हापूर सराफांच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष

आंदोलन मागे घेण्यास सराफांचा नकार

देशभरातील बहुसंख्य सराफांचे अबकारी करासंदर्भात सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यास मंगळवार नकार दिला. या संदर्भातील निर्णय ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आला असता त्यामध्ये कोल्हापुरातील सराफांनी भाग घेऊन आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. दरम्यान, अधिक माहितीसाठी येत्या शुक्रवारी (ता. २५) मुंबईत जीजेएफने बैठकीचे आयोजन केले आहे. तर उद्या बुधवारी कोल्हापूर सराफांच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष लागले असून, सराफांच्या होणाऱ्या विरोधाबाबत कोणती भूमिका घेतली जाणार याचे तीव्र पडसादही या बठकीत उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
देशभरातील जेम्स अँड ज्वेलरी या सराफांच्या शिखर संघटनेची मुंबईत बठक झाली. त्यामध्ये देशभरातून जवळपास ५० सराफ ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले. त्यामध्ये कोल्हापुरातून माणिक जैन, सुहास जाधव, राजेश राठोड आणि किशोर परमार असे चौघे जण सहभागी झाली होते. त्यात जवळपास ४० सराफांनी अबकारी कर मागे घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येऊ नये, यावर अधिक भर दिला. त्यानुसार बहुमताने बठक आयोजित करण्याचे ठरले, त्यानुसार शुक्रवारी (ता. २५) बठक आयोजित केली आहे.
याबाबत माणिक जैन यांनी सांगितले, की जवळपास ७० मिनिटे चाललेल्या या बठकीत जवळपास सर्वच सराफांचे अबकारी कर मागे घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेऊ नये, असे मत होते. त्यानुसार स्थानिक पातळीवरही सर्वाचे मत घेऊन पुढील निर्णय घेऊ.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2016 at 03:30 IST
ताज्या बातम्या