सातारा: सातारा जिल्हा पोलीस दलाच्या प्रशासकीय कामकाजात अधिक परिणामकारकता, गतिशीलता आणि समन्वय साधण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अंतर्गत बदल्यांचा मोठा निर्णय घेतला. जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार, एकूण ४१ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मंजुरी देण्यात आली आहे. या मोठ्या फेरबदलामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांना नवे प्रभारी अधिकारी मिळाले आहेत.प्रशासकीय कार्यक्षमतेसाठी पोलीस अधीक्षकांचा निर्णय घेण्यात आला आहे.विविध पोलीस ठाण्यांच्या प्रभाऱ्यांमध्ये बदल करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सात महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांच्या प्रभारी पदांवर नवीन पोलीस निरीक्षकांची (पीआय)नियुक्ती करण्यात आली आहे, तर एका अधिकाऱ्याची नियंत्रण कक्षात रवानगी झाली आहे.
महेंद्र जगताप (खंडाळा पोलीस ठाणे ),घनश्याम बल्लाळ ( फलटण), शहर पोलीस ठाणे,अरुण देवकर (कोरेगाव) ,प्रदीप सूर्यवंशी –
(वाई )शितलकुमार कोल्हाळ (कराड तालुका) ,महेश इंगळे ) शिरवळ ), हर्षद गालिंदे ( महाबळेश्वर), बापूसाहेब सांडभोर – नियंत्रण कक्ष.
सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) स्तरावरील बदल्या
गुन्हे शाखा, वाहतूक आणि ग्रामीण भागातील ठाण्यांना बळकटी देण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्तरावर खालीलप्रमाणे फेरबदल करण्यात आले आहेत
राजेश माने(सातारा शहर वाहतूक शाखा)अभिजित यादव (स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी),अभिजित चौधरी (कराड शहर), प्रकाश भुजबळ(कराड तालुका) ,निलेश तारू(पाटण) राजेश माळी (सायबर पोलीस ठाणे) रघुनाथ शिंदे (कोरेगाव) चंद्रहार पाटील (सातारा तालुका) भाऊसाहेब गोसावी (दहिवडी) संदीप साळुंखे (कराड शहर वाहतूक शाखा), प्रदीप जाधव(वाई), संदीप गोसावी (सातारा शहर), सुनील जानकर (औंध) (प्रभारी)
उपनिरीक्षक बदल्या व मुदतवाढ या आदेशांतर्गत काही पोलीस उपनिरीक्षकांच्या (पीएसआय) बदल्यांनाही मंजुरी देण्यात आली आहे, तर कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता काही अधिकाऱ्यांना त्यांच्या विद्यमान पदस्थापनेवरच मुदतवाढ देण्यात आली आहे.
सतिश दत्तात्रय मयेकर (औध पोलिस ठाणे) मुदतवाढ, रमेश पंडीत ठाणेकर (उंब्र,३१ ऑगस्ट २६पर्यंत मुदत वाढ) अविनाश श्रीकांत गवळी (उंब्रज ), कृष्णा केशव डिसले (कराड शहर, १ वर्ष मुदतवाढ), सचिन दगडू भिलारी (पाटण ), राजेंद्र अंकुश सदगर (वडूज ), अमित शरद शिंदे (म्हसवड) अनिल सावळाराम जायपत्रे (सातारा शहर,१ वर्ष मुदतवाढ) प्रिया गंगाराम पाटील (कराड शहर, १ वर्ष मुदतवाढ) शितल शरद माने(खंडाळा) अयोध्या प्रकाश घोरपडे(उंब्रज), दिपीका दिलीप मुसळे(सातारा शहर ) ज्योती गोविद बैनवाड(मानवी तस्करी प्रतिबंधक कक्ष'(एएचटीयू) शरद नारायण देसाई (नियंत्रण कक्ष) चंद्रकांत परशराम पुजारी(स्थानिक गुन्हे शाखा)
बदली झालेल्या सर्व ४१ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणत्याही विलंबाशिवाय तातडीने आपापल्या नव्या पदस्थापनेचा कार्यभार स्वीकारावा आणि तसा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर करावा, असे कडक निर्देश पोलीस अधीक्षकांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या आदेशात देण्यात आले आहेत. या फेरबदलामुळे सातारा जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाला नवी कडक शिस्त आणि गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
