Satara ZP Election Winner List 2026 : सातारा जिल्हा परिषदेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून चांगलाच जोर लावण्यात आला होता. या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत बहुमत कोणाला मिळणार याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यावेळी भाजपाचे सत्ताबळ वाढल्याने जिल्हा परिषदेवर भाजपाची सत्ता येणार असा दावा भाजपाच्या वतीने केला जात आहे, तर कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा आपली सत्ता कायम राखणार, असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या ६५ गटांसाठी आणि १३० गणांसाठी शनिवारी ६७.८० टक्के मतदान झाले होते. दरम्यान आज निवडणुकीचे निकाल जाहीर केले जात आहेत.
आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत…
सातारा जिल्हा परिषद निवडणूक २०२६ – विजयी उमेदवारांची यादी
सातारा – मायणी गटातून भाजपाचे उमेदवार सुरज पाटील विजयी झाले आहेत
सातारा – पाटखळ गटातून शुभांगी जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस )
सातारा – लिंब गटातून सर्जेराव सावंत (भाजपा)
सातारा – खेड गटातून कामेश कांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस)
कराड – मसूर गटातून लालासो जगदाळे (भाजपा) विजयी
पाटण – गोकुळ तर्फ हेळवाक गटातू अशोक पाटील (शिवसेना)
पाटण – तारळे गटातून स्वप्ना अभिजीत पाटील (शिवसेना)
पाटण – मारुल हवेली (ओबीसी महिला) गटातून योगिता गिरी विजयी
पाटण – हेळवाक तर्फ अशोकराव पाटील – शिवसेना (शिंदे)
पाटण – तारळे जिल्हा परिषद गट स्वप्ना पाटील – शिवसेना (शिंदे)
पाटण – मल्हारपेठ गट – विजया कुंभार – शिवसेना (शिंदे)
पाटण – मारुल हवेली गट- योगिता गिरी- शिवसेना (शिंदे)
पाटण – मंद्रुळ कोळे गट – मृणाल पाटील – शिवसेना (शिंदे)
पाटण – म्हावशी जिल्हा परिषद गट राजेश पवार (भाजपा)
सातारा पंचायत समिती विजयी उमेदवार
पाटण – हेळवाक तर्फ गण – मंगल माने – शिवसेना (शिंदे)
पाटण – येराड गण – विद्या शिंदे – शिवसेना (शिंदे)
मुरुड गण – सविता पवार – शिवसेना (शिंदे)
पाटण – तारळे गण – विकास जाधव – शिवसेना (शिंदे)
म्हावशी गण – शंकर घाडगे – (भाजपा)
पाटण – चाफळ गण – राधिका पाटील – शिवसेना (शिंदे)
पाटण -मल्हारपेठ गण – अर्चना पाटील – शिवसेना (शिंदे)
पाटण -नाडे गण- विजय पवार – शिवसेना (शिंदे)
पाटण -मारुल हवेली गण -प्रियांका देसाई – शिवसेना (शिंदे)
पाटण -नाटोशी गण- प्रशांत पवार – शिवसेना (शिंदे)
पाटण -सणबुर गण – संपदा जाधव – शिवसेना (शिंदे)
पाटण – मंद्रुळ कोळे गण- नितीन काळे – शिवसेना (शिंदे)

