कोल्हापूर : माजी गृह राज्यमंत्री व विधान परिषद सदस्य सतेज पाटिल यांची काँग्रेसच्या विधान परिषद गटनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनी गुरुवारी सभागृहात त्यांच्या निवडीची घोषणा केली सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्हयात पक्ष संघटना वाढीस चालना दिली आहे.
हेही वाचा >>> कोल्हापुरात संजय राऊंतांना काळे झेंडे दाखवणारे शिवसैनिक ताब्यात
कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहराज्य मंत्री, ग्रामविकास, अन्न व औषध प्रशासन अशा विविध विभागांची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. काँग्रेस पक्षाने आजपर्यंत दिलेल्या जबाबदारीला न्याय देण्याचा आपण प्रयत्न केला आहे. गटनेतेपदालाही न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे सतेज पाटील म्हणाले.