शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर आवाज उठवणाऱ्या विरोधी पक्षातील १९ आमदारांचे निलंबन करण्यात आले. भाजपाची ही भूमिका लोकशाहीचा गळा दाबणारी आहे. हे सरकार शेतकरी विरोधी असल्याने त्यांच्याविरुध्द संघर्ष करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय विरोधक स्वस्थ बसणार नाहीत, असे मत आमदार सतेज पाटील यांनी रविवारी व्यक्त केले. कोल्हापूर जिल्हा काँग्रेस समितीत आयोजित केलेल्या संघर्ष यात्रा नियोजन बठकीत ते बोलत होते.

काँग्रेस-राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष, आरपीआय कवाडे गट आणि समविचारी पक्षाच्यावतीने शेतकतऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मंगळवारी (२५ एप्रिल) कोल्हापुरात संघर्ष यात्रा येणार आहे. या संघर्ष यात्रेच्या पूर्वनियोजनासाठी जिल्हा काँग्रेस समितीच्या कार्यालयात आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बठक झाली.

या वेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर वेळकाढूपणा करणाऱ्या भाजप सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. उद्योजकांना ३५ हजार कोटींची कर्जमाफी मिळत असेल तर शेतकऱ्याला का नाही असा सवाल उपस्थित करत जोपर्यंत शेतकऱ्याचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

आमदार सतेज पाटील यांनी भाजपच्या धोरणावर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजपकडे आमदारांचे अधिकसंख्या बळ असल्याने चुकीची धोरणे आणि विधेयक संमत करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. संघर्षयात्रेसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण उपस्थित राहणार असून त्यांच्या स्वागतासाठी हारतुरे न देता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी हजारो स’ाांचे निवेदन देण्याचे आवाहन पाटील यांनी केले.इचलकरंजीचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी भाजप सरकार शेतकऱ्यांची घरे, जमिनी उद्योजकांच्या घशात घालत असल्याचा आरोप केला. महिला जिल्हाध्यक्षा अंजना रेडेकर, सर्जेराव िशदे, संजय पाटील, इचलकरंजी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश मोरे, जिल्हा परिषद स दस्य बजरंग पाटील यांनी संघर्ष यात्रा यशस्वी करण्याचे आवाहन केले.