scorecardresearch

कोल्हापूर: “…ही कसली भाजपाची संस्कृती?”, सतेज पाटलांचा संतप्त सवाल

कोल्हापूर शहर भाजपा धार्जिणे नाही हे दाखवून देऊ असंही पाटील म्हणाले आहेत.

कोल्हापूर शहर भाजप धार्जिणे नसल्याचे या पोटनिवडणुकीत दाखवून देऊया. कोल्हापूर शहराची पहिली महिला आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांना करण्याची जबाबदारी पार पाडूया, असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी व्यक्त केले. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा सायंकाळी पार पडला.


यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मित्र पक्षाच्या प्रमुखांनी जाधव यांना निवडून आणण्याची ग्वाही दिली. ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जयश्री जाधव यांनी मला भावाप्रमाणे मदत करावी असे आवाहन केले होते. मीच नाही तर लाखो मतदार भाऊ त्यांच्या पाठीशी राहून विजयी करतील.
मूळचे उद्योगात असलेले चंद्रकांत जाधव यांनी राजकारणात येऊन समाजकारणावर भर दिला. त्यांचे अकाली निधन झाल्यानंतर भाजपने पोटनिवडणूक लढवणे त्यांच्या कोणत्या संस्कृतीत बसते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून प्लास्टिकच्या नव्हे तर सोन्याचे डबे वाटप केले तरी त्याचा फायदा होणार नाही.


राष्ट्रवादीकडून झालेल्या दगाफटका या शब्दाचा संदर्भ देत शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले, शिवसेनेकडून कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत कसलाही दगाफटका होणार नाही. शिवसेना पाठीमागून कधीच वार करत नाही. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख नेते प्रचारासाठी येणार आहेत.


जयश्री जाधव यांनी चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर भाजपाने मन मोठे करायला हवे होते. पण चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक लावली असली तरी कोल्हापूरकर माझ्या पाठीशी भावाप्रमाणे राहतील, असा विश्वास व्यक्त केला. शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, आमदार ऋतुराज पाटील यांची भाषणे झाली.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Satej patil criticises bjp over elections in kolhapur vsk

ताज्या बातम्या