कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या सुनावणी सुरू असलेल्या ११०८ सगळ्याच संस्था खोट्या आहेत असे नाही. त्या संस्थांना त्यांची योग्यतेची बाजू मांडण्याची संधी मिळाली पाहिजे. गोकुळ दूध संस्थेवर साडे पाच लाख शेतकरी अवलंबून आहेत. कोणत्याही स्थितीत गोकुळ दूध संघ टिकला पाहिजे. राज्यात महायुतीचे शासन असतांना, गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष असताना तेथे प्रशासक येणे दुर्दैवी आहे. महायुती अंतर्गत मतभेदातून भाजपने गोकुळवर प्रशासक लादला आहे, असा आरोप काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषेद केला. 

ते म्हणाले, सध्या गोकुळमध्ये , हसन मुश्रीफ, प्रकाश आबीटकर, विनय कोरे यांसह जे जे नेते सत्तेत आहेत. तेथे अध्यक्ष सुद्धा महायुतीचाचं आहे. मग, महायुतीच्याच नेत्यांनाच प्रशासक पाहिजे होता का, की त्या नेत्यांचे काही चालत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. आमदार शिवाजी पाटलांनी जी भूमिका घेतली. महायुतीतील नेत्यांनी त्यांच्याशी बोलून गैरसमज दूर करायला पाहिजे होता. प्रशासक येणे म्हणजेच सर्वजण सामील आहेत असे माझे मत आहे. जिल्हा सहकारी बँक ही आमची मातृसंस्था असून सभासदांसाठी ती टिकली पाहिजे.

राज्यात आता कायदा-सुव्यवस्था यांची स्थिती चांगली नसून राज्यासाठी स्वतंत्र गृहमंत्र्यांची आवश्यकता आहे. ‘एस.आय.आर.च्या माध्यमातून जे काम चालू आहे ते होण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे ते काम पूर्ण होण्यासाठी निवडणूक आयोगाने वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी सतेज पाटील यांनी केलीगोकुळची निवडणूक निवडणूक पुढे जावे आणि प्रशासक यावा असे प्रयत्न केले होते. हे स्पष्ट दिसत आहे. सहकाराच्या दृष्टीने हे दुर्दैव आहे. पावसाळ्यानंतर निवडणूक होण्याची शक्यता आहे. पुढील ७० दिवसांमध्ये ठराव घेऊन बाराशे संस्थांची प्रक्रिया 90 दिवसाच्या प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर त्याला थांबवू शकत नाही. सरसकट सर्व ११०८ संस्था चुकीच्या आहेत असं होत नाही. बाराशे संस्था या विरोधात न्याय मागतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

गोकुळ दूध संघाच्या विरोधात तक्रार देणारे प्रकाश बेलवडे हे भाजपचे आहेत. मग त्यांची त्यांनी समजूत का काढली नाही. हे त्यांच्या घरातलं भांडण आहे, असा उल्लेख करून सतेज पाटील यांनी सांगितले की, तीन संचालकांवर ईडीची कारवाई करण्याची भूमिका मांडली जात आहे. पण त्यांच्याकडे अशी कोणती माहिती आहे. ज्यामुळे ते ईडीची कारवाई लावणार आहेत. या संचालकांसोबत त्यांनी चर्चा करायला पाहिजे होती.
राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेनेला कशा पद्धतीने वागणूक मिळते हे आपण पाहत आहोत. भाजपचा अजेंडा स्वबळाचा असल्याचा आरोप पाटील यांनी केला. गोकुळनंतर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक साफ करणार आहेत असे म्हटले जात आहे. असे असेल तर महायुतीने त्यांची बोलावून समजूत काढली पाहिजे. अदृश्य शक्ती कोण आहे? हे मला माहिती नाही, असे सतेज पाटील म्हणाले.