लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : टोल नाक्यावर टोलमाफीचे आंदोलन करून सतेज पाटील यांनी राजकीय स्टंट केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा खटाटोप आहे. सतेज पाटील हे स्वतःच टोलमाफिया असल्याने त्यांना टोल प्रश्नी आंदोलन करण्याचा अधिकार नाही, असे टीकास्त्र भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी डागले आहे.

राष्ट्रीय महामार्गावर काँग्रेसने केलेल्या आंदोलनासंदर्भात पत्रकारांशी बोलताना महाडिक म्हणाले, की टोलनाक्यावर आंदोलन करून सतेज पाटील यांनी नकारात्मक कथानक रचण्याचा प्रयत्न चालवला आहे. कोल्हापुरात टोल आंदोलन झाले तेव्हा त्यांनी स्वतः टोल आकारणीची पावती केली होती. टोलमध्ये अर्थपूर्ण व्यवहार करण्यासाठीच (ढपला पाडण्यासाठी) त्यांनी पावती फाडली होती, असा आरोप त्यांनी केला.

आणखी वाचा-कोल्हापूर : काँग्रेसच्या आंदोलनानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून २५ टक्के टोल माफ केल्याची घोषणा

भाजप-शिवसेना सरकारने रस्ते करणाऱ्या कंपनीचे पैसे अदा करून कोल्हापूरकरांना टोल माफी दिली होती. रस्ते खराब असतीलल तर टोल आकारणी करू नये या भूमिकेशी मी सहमत आहे, असेही ते म्हणाले.