राजीव गांधी योजनेत रुग्णांच्या लुटीच्या तक्रारी

आमदार राजेश क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना खडसावले

( प्रतिकात्मक छायाचित्र )

आमदार राजेश क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना खडसावले

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राजीव गांधी योजनेत रुग्णांची आíथक लूट होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. यावर प्रशासनाचे नियंत्रण नसून ठराविक रुग्णालयांच्या मनमानी कारभारास खतपाणी घालण्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे, अशा शब्दांत आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज झालेल्या एका बठकीत अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. रुग्णालयांसमोर उद्भवणाऱ्या समस्या जाणून घेऊन महात्मा जोतिबा फुले योजनेमध्ये या त्रुटींचे निराकरण व्हावे, याकरिता प्रशासन आणि रुग्णालयांची येत्या १५ दिवसांत बठक घेऊन समस्यांचा सविस्तर अहवाल आपणाकडे सादर करावा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

नूतन महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील मान्यताप्राप्त रुग्णालयांच्या प्रमुख, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या आढावा बठकीचे आज जिल्हाधिकारी कार्यालय येथील महाराणी ताराराणी सभागृह येथे आयोजन करण्यात आले होते.

बठकीच्या सुरुवातीस राजीव गांधी योजनेची माहिती देताना फुले जन आरोग्य योजनेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन म्हणाले, सध्या या योजनेंतर्गत शासनाची १८ रुग्णालयाची मर्यादा असताना खास बाब म्हणून कोल्हापूर जिल्ह्याकरिता ३२ रुग्णालय मंजूर करण्यात आली आहेत. ज्या तालुक्यामध्ये हॉस्पिटल नाहीत, त्या ठिकाणी फुले जन आरोग्य योजनेचे काम सुरू करण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. या ३२ रुग्णालयातील एक रुग्णालय शासकीय असून उर्वरित खासगी आहेत.

आजतागायत सुमारे ४१ हजार रुग्णांनी उपचार घेतले असून, सुमारे ७१ हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.  या योजनेमध्ये अकार्यान्वित असणाऱ्या रुग्णालयांची मान्यता रद्द केली असल्याची माहिती दिली.

यावेळी अधिकारी महेंद्र वारभुवन यांना थांबवीत आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित रुग्णालयांच्या प्रतिनिधींची ओळख करून देण्याच्या सुचना दिल्या. यातील गरहजर असलेल्या रुग्णालयांना तातडीने कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना केल्या. यांसह मागील बठकीमध्ये देण्यात आलेल्या सूचनांवर काय कार्यवाही केली, अशी विचारणा उपस्थित अधिकाऱ्यांना केली.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कोल्हापूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Scam in rajiv gandhi jeevandayee arogya yojana

ताज्या बातम्या