scorecardresearch

कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलगी ठार; वाघाच्या हल्ल्यात बैल ठार

बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळी चारण्यासाठी गेलेली शाळकरी मुलगी ठार झाल्याचा प्रकार शाहूवाडी तालुक्यात सोमवारी घडला.

leopard and tiger
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलगी ठार; वाघाच्या हल्ल्यात बैल ठार ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

कोल्हापूर : बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळी चारण्यासाठी गेलेली शाळकरी मुलगी ठार झाल्याचा प्रकार शाहूवाडी तालुक्यात सोमवारी घडला. सारिका बबन गावडे असे मृत मुलीचे नाव आहे.शित्तूर वरून पैकी तळीचा वाडा येथे राहणारी सारिका गावडे ही चुलती समवेत घराशेजारी शेळी चारण्यासाठी गेली होती. तेथून सुमारे २०० मीटर अंतरावर गवताच्या दाट झुडपात बिबट्या दबा धरून बसला होता. त्याने बेसावध सारिकाला लक्ष्य करीत हल्ला केला. हा प्रकार पाहून चुलतीने आरडाओरडा केल्यावर बिबट्या पळून गेला. तथापि या घटनेत सारिकाचा मृत्यू झाला असून शाहूवाडी पोलीस ठाणे व मलकापूर वन विभाग येथे नोंद झाली आहे.

बिबट्याच्या दहशतीत वाढ

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्याचे प्रकार सतत घडत आहेत. केदारलिंगवडी येथे शाळकरी मुलीचा मृत्यू, उखळू येथे शाळकरी मुलावर हल्ला, कदमवाडी येथे तरुणाला केलेले लक्ष्य, शेकडो गाई, नाहीस, शेळ्या यांचा फडशा यामुळे भीतीचे वातावरण असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

sheep killed wolf attack
सांगली : लांडग्यांच्या हल्ल्यात २६ मेंढ्या ठार, २० गायब
60 year old man, honey bee attack, death due to honey bee attack, farmer death in honey bee attack
मधमाश्यांच्या हल्ल्यात वृध्दाचा मृत्यू, धुळे तालुक्यातील घटना
leopard attack, leopard attack at Dewari in Gyanganga Sanctuary
बुलढाणा: बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार; ज्ञानगंगा अभयारण्यातील देव्हारी येथील दुर्देवी घटना
cannabis gram Juna Andura
अकोला : वारे पठ्ठ्या! त्याने शेतात लावली चक्क गांजाची झाडे, पोलिसांना कळताच…

वाघाने केला बैल लक्ष्य

दरम्यान, आजरा तालुक्यातील आवंडी धनगरवाडा येथे पट्टेरी वाघाने पाळीव जनावरावर हल्ला केला. यामध्ये एका बैलाचा मृत्यू झाला. धुळू कोंडीबा कोकरे यांच्या बैलाचा मृत्यू झाल्याने धनगर वाड्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्री उशिरा कोल्हापूर येथून वन विभागाचे बचाव पथक धनगरवाड्यात दाखल झाले आहे. ड्रोन द्वारे वाघाचा शोध घेतला; मात्र त्यात यश आले नाही. वनपालक संजय निळकंठ, वनसेवक गंगाराम कोकरे यांनी पंचनामा केला. दोन महिन्यापूर्वी याच भागातील जगु कोकरे यांच्या बैलावर पट्टेरी वाघांनी हल्ला केला होता

Latest Comment
View All Comments
Post Comment

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: School girl killed in leopard attack bull killed in tiger attack kolhapur amy

First published on: 20-11-2023 at 20:44 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×