scorecardresearch

Premium

शेतकरी संघाचे अधिग्रहण मागे घेण्यासाठी कोल्हापुरात मोर्चा; राज्य शासन,पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी

नवरात्र उत्सवाच्या काळासाठी शेतकरी संघाची भूमिगत मजला, तळमजला व पहिला मजला अशी वास्तू  जिल्हा प्रशासनाने आपत्ती अधिनियम अंतर्गत ताब्यात घेतली आहे.

shetkari sangh march at collector office in kolhapur
शेतकरी संघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

कोल्हापूर : शेतकऱ्यांची मालकी असलेल्या शेतकरी संघाच्या इमारतीचे अधिग्रहण मागे घेण्यात यावे, या मागणी साठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये संघाचे आजी-माजी कर्मचारी सभासद, महिला, तरुण तसेच सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. यावेळी राज्य शासन, पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

नवरात्र उत्सवाच्या काळासाठी शेतकरी संघाची भूमिगत मजला, तळमजला व पहिला मजला अशी वास्तू  जिल्हा प्रशासनाने आपत्ती अधिनियम अंतर्गत ताब्यात घेतली आहे. या विरोधात कोल्हापूर शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. अशा मनमानी पद्धतीने  इमारतीचे अधिग्रहण करण्यास सभासदांनी एका बैठकीत विरोध केला होता. त्यामध्ये ठरलेल्या निर्णयानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये पाच हजाराहून अधिक नागरिक सहभागी झाले होते.

Thackeray group's warning to Hasan Mushrif
“स्वार्थासाठी मराठा समाजाचा वापर करणे सोडून द्यावे अन्यथा…”, हसन मुश्रीफांना ठाकरे गटाचा इशारा
Banana producers in Jalgaon flood victims
जळगावातील केळी उत्पादक विमाधारकांसह पूरग्रस्तांना तत्काळ मदत द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे निवेदनरूपी केळी पान जिल्हाधिकार्‍यांना सुपूर्द
mantralay 13
आरक्षण पेचातील सुटकेनंतर मतपेढीची आखणी; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर १५ मोर्चे, आदित्य ठाकरे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
amit shaha
शहा यांच्या सभेस ‘लाभार्थीना’ बोलवा!; मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या पूर्वसंध्येस गर्दी जमविण्याचे प्रशासनाला आदेश

हेही वाचा >>> महाराष्ट्र-कर्नाटकात ‘उसाचे राजकारण’; ऑक्टोबरमध्ये गाळप हंगाम सुरू करण्यास कर्नाटक सरकारची वेसण

यावेळी अशासकीय प्रशासकीय अधिकारी मंडळाचे अध्यक्ष सुरेश देसाई म्हणाले, संघाची इमारत जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे जुलमी पद्धतीने अधिग्रहण करीत आहेत.या कारवाईचा निषेध आणि संघ ताब्यात घेण्याचा प्रयत्न मागे घ्यावा या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला आहे.

मोर्चातील नागरिकांनी डोक्यावर शेतकरी संघ वाचवा अशा आशयाच्या टोप्या परिधान केल्या होत्या. शेतकरी संघाची जागा हडप करण्याचा प्रयत्न पालकमंत्री दीपक केसरकर करत आहेत त्याला जिल्हाधिकारी राहुल रेखावर मदत करत असल्याचे सांगून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सहकार वाचवा, राहुल रेखावर चले जावो, राज्य शासनाचा निषेध असो अशा आशयाचे फलक सभासदांनी हातात घेतले होते.

बैलगाडी, सहकार ध्वज

बैल हे शेतकरी संघाचे बोधचिन्ह असल्याने मोर्चामध्ये सजवलेली बैलगाडी तसेच सहकार ध्वज फडकत होता. मोर्चामध्ये आमदार ऋतुराज पाटील, शिवसेना ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आर. के. पोवार, कॉम्रेड दिलीप पवार, अनिल घाटगे यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हेही वाचा >>> शिरोळच्या शेतकऱ्याची दर्यादिली; शेतमजुरांना सहकुटुंब विमानातून बालाजी दर्शन घडवले

तात्पुरते अधिग्रहण दरम्यान, देवस्थान समितीचे सचिव प्रांताधिकारी सुशांत बनसोडे यांनी शेतकरी संघाच्या इमारतीचे तात्पुरत्या अधिग्रहण करण्यात आले आहे. याद्वारे मालकी बदलता येत नाही. शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचवण्याचा उद्देश देवस्थान समितीचा नाही, असा खुलासा रात्री उशिरा केला आहे. मोर्चा येणार असल्याची माहिती असतानाही प्रशासनाने निवांतपणे खुलासा केला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shetkari sangh march at collector office demand to withdrawn building acquisition owned by farmers zws

First published on: 27-09-2023 at 14:34 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×