कोल्हापूर : शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर मातोश्रीवरून पक्ष बांधणीसाठी नव्याने सूत्रे हलत आहेत. कोल्हापूर शहरात नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले. कोल्हापूर जिल्ह्यातून राजेंद्र पाटील यड्रावकर, प्रकाश आबिटकर , राजेश क्षीरसागर यांनी शिंदे गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला. यामुळे कोल्हापुरात शिवसेनेला जबर धक्का बसला.

यानंतर शिवसेनेने नव्याने पक्ष बांधणी सुरू केली आहे. यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती सुनील मोदी, दक्षिण मतदार संघासाठी माजी उपमहापौर रवीकिरण इंगवले, तर शहर समन्वयक म्हणून हर्षल सुर्वे यांचे नियुक्ती केली आहे. अवधूत साळुंखे, पोपट दांगट हे उपजिल्हाप्रमुख असतील. तर प्रीती क्षीरसागर, प्रतिज्ञा उत्तरे यांच्याकडे शहर संघटकची जबाबदारी देण्यात आली आहे.

Chandrapur, Sudhir Mungantiwar, Pratibha Dhanorkar,
चंद्रपूर : राजकीय आखाड्यात, चौका-चौकात, कट्ट्यावर रंगू लागल्या ‘ताई’ आणि ‘भाऊ’च्या चर्चा; सट्टाबाजारात…
Uneasiness in Congress as Priyanka Gandhi is not getting a meeting
चंद्रपूर : प्रियंका गांधींची सभा मिळत नसल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींची सभाही रद्द
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा
history of ramleela maidan
रामलीला मैदान- जयप्रकाश नारायण यांचे इंदिरा गांधींविरोधात आंदोलन ते आप पक्षाच्या स्थापनेचे केंद्र