कोल्हापूर : शिवसेनेच्या दोनदिवसीय राज्यव्यापी महाअधिवेशनास शुक्रवारी प्रारंभ झाला. पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने प्रारंभ करण्यात आला. या वेळी सहा ठराव पदाधिकाऱ्यांनी एकमताने संमत केले. त्यातील पहिले तीन ठराव पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अभिनंदनाचे होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

  या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, की अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात सहा ठराव संमत करण्यात आले आहेत. श्रीराम मंदिर उभारल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारा पहिला ठराव पारित करण्यात आला. देशाची प्रगती होण्यासाठी मोदी यांनी काम केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन, गृह व सहकारमंत्री अमित शहा यांनी काश्मीरबाबत अनुच्छेद ३७० रद्दसंदर्भात घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर योजना सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल अभिनंदन करणारा ठराव होता. पाचवा ठराव हा राजकीय ठराव असून, लोकसभेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढून राज्यात मिशन ४८ यशस्वी करणे हा होता. 

हेही वाचा >>>मराठा समन्वयकांसोबत मुख्यत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत कोणताही तोडगा नाही; जरांगे पाटलांचे उपोषण सुरूच राहणार

निष्ठावंत शिवसैनिकांच्या नावाने पुरस्कार

शिवसेना वाढवण्यासाठी बाळासाहेबांसमवेत ज्यांनी काम केले आहे त्यांच्या नावाने शिवसन्मान पुरस्कार देण्याचा ठराव पारित करण्यात आला. यामध्ये दत्ताजी साळवी या नावाने उत्कृष्ट कामगार पुरस्कार, सुधीर जोशी यांच्या नावाने नावीन्यपूर्ण नवउद्योजक पुरस्कार, प्रमोद नवलकर यांच्या नावाने उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, दत्ता नलावडे यांच्या नावाने आदर्श शिवसैनिक, दादा कोंडके यांच्या नावाने कला क्षेत्रातील उत्कृष्ट पुरस्कार, वामनराव महाडिक यांच्या नावाने शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार, उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता हा पुरस्कार शिवसेना नेते शरद आचार्य यांच्या नावाने दिला जाईल. हे पुरस्कार शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त जाहीर होणार असून, त्याचे वितरण शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होईल, अशी माहिती सामंत यांनी दिली.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena statewide convention begins in kolhapur in the presence of the chief minister amy
First published on: 17-02-2024 at 03:17 IST