सोलापूर : सोलापूर कृषी कृषी उत्पन्न बाजार समिती जवळील शेळगी ब्रिज येथे शुक्रवारी (दि. ३१) पहाटेच्या सुमारास एसटी बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे सोलापूर-धाराशिव मार्गावर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. बसचालक दादाराव बनसोडे यांचा मृत्यू झाला आहे.

​महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची हिरकणी बस (क्र. एमएच १४ एलबी ०३८०) ही, मालट्रक ( एमएच १३ एएक्स ३९४९) पाठीमागून धडकल्याने हा अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की, बसचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला असून रस्त्यावर प्रवाशांच्या साहित्याचा खच पडला होता.

या भीषण अपघातात दादाराव भालचंद्र बनसोडे (वय ४३, रा. चिवरी, उमरगा, जि. धाराशिव), नागुबाई राम रेवघे (वय ४८, रा. अनदुर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव)यांचा मृत्यू झाला. तर, दहा प्रवासी जखमी झाले आहेत. त्या जखमींवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

​रामचंद्र प्रभाकर देवघे (वय ५७)
​विकास प्रकाश पाटील (वय ३२)
​माणिक नागप्पा वायचळ (वय ५४)
​रामली लिंग ब्रह्मानंद कापसे (वय ४०)
​अभिषेक दीपक चव्हाण (वय २५)
​अनिकेत सुभाष राठोड (वय ३०)
​अभिजीत अरुण चव्हाण (वय ४४)
​नागोराव किसू तोडसांग (वय ३७)
​अनुराधा अर्जुन चव्हाण (वय ६०)

​तुळसीदास मनोहर पाचंगे (वय ४९) अशी जखमीची नावे आहेत.पहाटे अपघाताची माहिती मिळताच जोडभावी पेठ ठाण्याचे सोलापूर पोलीस आणि फॉरेन्सिक टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. तपास सुरू आहे.