सातारा : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचा बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुःखद घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्वतःचे वैयक्तिक दुःख बाजूला ठेवत विदीप जाधव यांच्या तरडगाव (ता. फलटण) येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
स्वर्गीय विदीप जाधव यांच्या पत्नी व मुलांच्या डोक्यावर मायेने हात फिरवत, “कोणत्याही अडचणीत मी तुमच्या सोबत आहे,” असा धीर देत त्यांनी कुटुंबीयांना आधार दिला. या भावस्पर्शी भेटीमुळे परिसरात उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले. कर्तव्यपथावर असतानाही अत्यंत संयम व मायेने जाधव कुटुंबीयांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला. विदीप यांच्या कुटुंबात आई-वडील, पत्नी आणि एक मुलगा- एक मुलगी असे सदस्य आहेत.
विदीप दिलीप जाधव हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत निष्ठावान आणि सतर्कसुरक्षा रक्षक होते. ते वर्ष २००९ पासून मुंबई पोलीस दलात कार्यरत होते आणि अनेक वर्षे अजित पवार यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहून त्यांची सुरक्षा करत होते. दुर्दैवाने बारामती येथे झालेल्या विमान अपघातात विदीप जाधव यांचे निधन झाले. मृतांमध्ये अजित पवार यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांचाही समावेश आहे.ते साताऱ्यातील तरडगाव (ता फलटण) येथील रहिवासी होते.
या भीषण दुर्घटनेत अजित पवारांच्या बरोबर विदीप जाधव यांचाही मृत्यू झाल्यानंतर सुनेत्रा पवारांनी त्यांच्या घरी भेट दिली. त्यांनी कै. विदीप जाधव यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेतली व त्यांच्या दुःखात सहभागी होत धीर दिला. त्यांची पत्नी व कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी भेट घेतली. स्वर्गीय विदीप जाधव यांच्या पत्नी व मुलांच्या डोक्यावर मायेने हात फिरवत, “कोणत्याही अडचणीत मी तुमच्या सोबत आहे,” असा धीर देत त्यांनी कुटुंबीयांना आधार दिला. जाधव यांच्या कुटुंबीयांची त्यांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, सुनील माने ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

