scorecardresearch

कोल्हापूर जिल्ह्यात भानमतीचा प्रकार सुरूच

ग्रामपंचायत निवडणुकीत बोकाळलेला भानमतीचा प्रकार अजूनही कोल्हापूर जिल्ह्यात सुरू आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात भानमतीचा प्रकार सुरूच
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीत बोकाळलेला भानमतीचा प्रकार अजूनही कोल्हापूर जिल्ह्यात सुरू आहे. कोल्हापूर शहरालगत असलेल्या सादळे-मादळे या जुळ्या गावात हा प्रकार उघडकीस आला आहे. एका कुटुंबातील तिघांच्या नावाने भानामती करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भानमतीचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू होते.

राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापुरच्या वैचारिक परंपरेवर प्रश्नचिन्ह लागले होते. अजूनही जिल्ह्यात भानामतीचे उद्योग सुरुच आहेत. करवीर तालुक्यातील सादळे मादळे गावात वडील आणि त्यांच्या दोन मुलांच्या नावाने उतारा टाकल्याचा प्रकार घडला आहे. विक्रम पाटील, निलेश पाटील आणि निखिल पाटील अशी नावे काळ्या बाहुल्यांवर लिहून उतारा टाकला आहे.

भीक घालत नाही

  तथापि, संबंधित कुटुबांतील तरुणाने उताऱ्याजवळ जाऊन अशा  आचरट प्रकारांना भीक घालत नाही , असे सांगत पुरोगामी विचारधारा जपली आहे. आम्ही सुशिक्षित माणसे आहोत. आजही लोक अंधश्रद्धेत जगतात. त्यांनी हे करणे योग्य नाही. यातून आम्हाला आणखी ऊर्जा मिळाली असून आम्ही चांगली कामे करत राहू, असे या कुटुंबीयांनी सांगितले.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-01-2023 at 15:20 IST

संबंधित बातम्या