scorecardresearch

कोल्हापूर : गुप्तधनाचा हव्यास नडला; महिलेच्या खून प्रकरणी संशयित मांत्रिक आरोपी अटक

गुप्तधन मिळवून देण्यासाठी ससेमिरा लावणाऱ्या महिलेचा खून केल्याप्रकरणी मांत्रिक असलेल्या संशयित आरोपीला पोलिसांनी शनिवारी एका दिवसात अटक केली.

कोल्हापूर : गुप्तधनाचा हव्यास नडला; महिलेच्या खून प्रकरणी संशयित मांत्रिक आरोपी अटक
संग्रहित छायाचित्र

गुप्तधन मिळवून देण्यासाठी ससेमिरा लावणाऱ्या महिलेचा खून केल्याप्रकरणी मांत्रिक असलेल्या संशयित आरोपीला पोलिसांनी शनिवारी एका दिवसात अटक केली. नामदेव शामराव पोवार (वय २४, रा. जोगेवाडी, राधानगरी) असे मांत्रिकाचे नाव आहे.करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द येथील एका शेतात आरती आनंद सामंत (वय ४५, रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर) या महिलेचा खून झाल्याचा प्रकार काल उघडकीस आला होता. करवीर पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध घेतल्यानंतर त्यांने गुन्ह्याची कबुली दिली.

आरती सामंत हिला घरात गुप्तधन असल्याची स्वप्न पडत होते. त्यासाठी तिने नामदेव पोवारसह काही मांत्रिकांच्या मागे गुप्तधन काढून देण्याचा तगादा लावला होता. हा ससेमिरा वाढत चालल्याने चिडलेल्या संशयित पोवार याने सामंत हिच्या डोक्यात वीट मारून खून केला. तिच्याजवळील पाटल्या, मंगळसूत्र, बांगड्या या सोन्याच्या वस्तू व मोबाईल घेऊन तो पळून गेला होता. पण पोलिसांनी त्याला २४ तासात जेरबंद केले.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या