कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा, लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासिका तारा भवाळकर यांच्या दोन पुस्तकांचा लोकार्पण सोहळा रविवारी कोल्हापुरात झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत यादव होते. प्रत्येक पुस्तकाच्या शंभर प्रति वारकऱ्यांना वाटण्यात आल्या.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वारकरी संत तसेच संत आणि अंधश्रद्धा निर्मूलन ही दोन पुस्तके प्रकाशित केल्याची माहिती अनिल चव्हाण यांनी प्रास्ताविकात दिली. प्रा.डॉ. छाया पोवार यांनी भवाळकर यांचे लोक साहित्यातील योगदानाचा परिचय करून दिला. मीना अनिल चव्हाण लिखित ‘तुका झालासे कळस’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. चंद्रकांत सूर्यवंशी यांनी पुढच्या वर्षी वारीमध्ये पुस्तक दान उपक्रम मोठ्या प्रमाणात करणार असल्याचे जाहीर केले. खंडोबा तालीम मंडळाचे अध्यक्ष अजित हारुगले, विक्रम जरग, युद्ध कला प्रशिक्षक पंडित पवार, कार्यकर्ते, भाविक उपस्थित होते.