कोल्हापूर : एकाच वेळी मागणीप्रमाणे वाहनांचा पुरवठा क्षमता असणाऱ्या राधानगरी तालुका सहकारी वाहतूक संस्थे (घोटवडे)कडून २५ ट्रक वाहने पूर्वीच्या निविदा दराने भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहेत. संचालक मंडळाच्या या निर्णयामुळे गोकुळ दूध संघाचे आर्थिक नुकसान झाले नाही.उलट दूध संस्थाना वेळेत पशुखाद्य पुरवठा होऊन दूध उत्पादकांना फायदा होणार आहे, असे स्पष्टीकरण गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी मंगळवारी केले आहे.

गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्यकारखान्यातील वाहन निविदेवर विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांनी सत्तारूढ संचालकांवर केलेल्या टीकेला पाटील यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, पंचतारांकित कागल येथे उत्पादन होणारे पशुखाद्य दूध संस्थाना वेळेत पोहोच करण्यासाठी माल वाहतुकीचे निविदा मागवली असता कमी वाहतूक दर देणारे ठेकेदार श्री.विठ्ठल रखुमाई सहकारी वाहतूक संस्था मुरगुड व शिवराज ट्रान्सपोर्ट  यांना काम सोपवले होते. पशुखाद्याच्या मागणीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून शिल्लक साठा राहत असल्याने वाहतुकीची पुरेशी व्यवस्था करण्यास कळवले होते. परंतु त्यांच्याकडून पशुखाद्याची वितरण व्यवस्था झाली नसल्याने दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याशी वेळोवेळी चर्चा करूनही पुरेशी वितरण व्यवस्था झाली नाही. त्यामुळे पशुखाद्य वेळेत मिळत नसलेल्या तक्रारीचा विचार करून आणखी २५ भाडेतत्त्वावरील वाहनांची व्यवस्था केली आहे.

pune ring road,
पुणे : रिंगरोडमध्ये परदेशी कंपन्यांना रस
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
drug-resistant tuberculosis
औषध प्रतिरोध क्षयरोग नियंत्रणात, क्षय बरा होण्याचा दर २०२३ मध्ये ८२ टक्के
slums in Dharavi
धारावीतील बहुमजली झोपड्यांसाठी विकास नियंत्रण नियमावलीत विशेष तरतूद?

गोकुळकडे दूध संकलनास परवानगी मिळावी यासाठी दूध संस्थांची मागणी आल्यावर संबंधित तालुक्यातील संचालकांची शिफारस घेऊन संकलनास परवानगी दिली जाते. ही पध्दत पूर्वीपासून असून मुडिशगी येथील दूध संस्थाना त्या तालुक्यातील संचालकांची शिफारस घेतल्यानंतर दूध संकलनास परवानगी देण्यात येणार आहे. दूध उत्पादक, ग्राहकांच्या बळावर गोकुळने झेप घेतली आहे. आमचा कारभार सभासदाभिमुख असताना महाडिक यांनी संमभ्र निर्माण करू नये, असा टोला अध्यक्ष पाटील यांनी लगावला.