कोल्हापूर : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने बोगस प्रतिज्ञापत्र सादर केल्याच्या तक्रारीवरून मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी सुरु केल्यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी कोल्हापुरात धाव घेवून परीस्तीतीचा आढाव घेतला. यावेळी स्वाभिमानी शिवसैनिक मशाल पेटवून गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी येथे रविवारी दिला.

जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या विभागामधील माहिती सादर केली. ६ हजार पेक्षा जास्त शिवसैनिक पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत. तर ८० हजार पेक्षा अधिक शिवसेना सभासद फॉर्म भरून दिले आहेत. विविध पदाधिकारी नियुक्त केल्या आहेत. त्यावर उर्वरित संघटनात्मक बांधणी ३० ऑक्टोबर पूर्वी करावी असी सूचना रावते यांनी दिले. शिवसेनेच्या या संघर्षमय काळामध्ये पक्षाबरोबर राहील त्याचे भवितव्य उज्वल असेल, असे ते म्हणाले.

शिवसेना उपनेतेपदी दूधवाडकर यांचा झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. बैठकीमध्ये शिवसेनेचे चिन्ह मशाल ही प्रज्वलित करून जोरदार घोषणा देण्यात आल्या. जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, तसेच सुजित मिनचेकर, उल्हास पाटील, सत्यजित पाटील हे माजी आमदार, दहा विधानसभेमधील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.