कोल्हापूर : राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य शासनाला आज प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे मराठा समन्वयकांसमवेत बैठक घेतली. यावेळी टिकणारे आरक्षणसह मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर मुख्यमंत्र्यांनी कोणताही ठोस तोडगा काढला नाही. यामुळे मराठा समन्वयक नाराज झाले.

यानंतर पत्रकारांशी बोलताना गेल्या ४० वर्षांतील सरकारची री याही सरकारने ओढली आहे. मुख्यमंत्री मराठा आहेत. मात्र त्यांच्या सरकारचा चालक वेगळा आहे. ते हतबल आहेत, अशी भूमिका मराठा समन्वयक बाबा इंदुलकर यांनी मांडली. अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. त्यांची तब्येत खालावल्याने मराठा समाज अस्वस्थ झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत मराठा समन्वयकांची तातडीची बैठक घेऊन यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. शासकीय विश्रमगृहात तासभर बैठक होऊनही जरांगे यांच्या आंदोलनाबाबत कोणताही ठोस तोडगा निघाला नाही.

Chief Minister Eknath Shinde refused to answer a question on the implementation of the package
पॅकेजच्या अंमलबजावणीवर मुख्यमंत्र्यांची सारवासारव; मराठवाडातील टंचाई आढावा बैठक वेळकाढूपणा असल्याची विरोधकांकडून टीका
eknath shinde slams uddhav Thackeray
बाळासाहेबांनी उद्धव यांना मुख्यमंत्री केलेच नसते! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा
CM Eknath Shinde hard work to save Nashik seat Communication with heads of institutions and organizations
नाशिकची जागा वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे कसोशीने प्रयत्न; संस्था, संघटनांच्या प्रमुखांशी संवाद
Eknath Shinde, ravindra waikar,
अडचणीच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत केल्यानेच पक्षप्रवेश, रवींद्र वायकर यांची सारवासारव
uddhav thackeray s had plan to arrest bjp leaders says eknath shinde
भाजप नेत्यांच्या अटकेचा ठाकरेंचा डाव उधळला! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
Arvind Kejriwal functioning from Tihar Jail Delhi Chief Minister Aam Aadmi Party
अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगातून दिल्लीचा कारभार कसा चालवतात?
BJP, Sangli, minorities, Sangli latest news,
सांगली : भाजपकडून अल्पसंख्यांकांना विश्वास देण्याचे काम
loksatta explained article, Chief Minister, BJP, seat allocation, influence, eknath shinde, mahayuti, lok sabha election 2024
विश्लेषण : जागावाटपात भाजपवर मुख्यमंत्र्यांची सरशी? महायुतीत शिंदेंचा प्रभाव वाढतोय का?

हेही वाचा – शिवसेनेचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात असल्याने महिला सुरक्षित – डॉ. नीलम गोऱ्हे

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मराठा समाजाचे समन्वयक बाबा इंदुलकर यांनी जरांगे पाटील यांच्याशी फोनवर बोलण्याची विनंती केली. मात्र तीही मुख्यमंत्र्यांनी नाकारली असे सांगितले.

हेही वाचा – कोल्हापुरातील अधिष्ठातापदाचा पोरखेळ सुरूच, डॉ. प्रकाश गुरव यांना हटवले; डॉ. एस. एस. मोरे यांची नियुक्ती

आमच्यात मतभेद नाहीत

कोल्हापूरसह सांगली सातारा जिल्ह्यातील समन्वयकांची सुमारे तासभर बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाल्यानंतर प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना अनेक मराठा समन्वयकांनी एकमेकांविरोधात नाराजी व्यक्त केली. यावेळी योगेश केदार, बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, दिलीप देसाई, प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.