scorecardresearch

पंचगंगेत हजारो मासे मृत्युमुखी

स्वाभिमानी कार्यकर्ते बंडू पाटील, विश्वास बालीघाटे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला माहिती देऊन पंचनामा करण्याची मागणी केली.

पंचगंगेत हजारो मासे मृत्युमुखी
दूषित पाण्यामुळे कोल्हापूर येथे नदीपात्रात मासे मृत्युमुखी पडले होते.

कोल्हापूर : कोल्हापूरपाठोपाठ आता तेरवाड (ता. शिरोळ) येथील नदीपात्रात मासे मृत्युमुखी पडल्याने पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

गेल्या काही दिवसांपासून नदीला काळेकुट्ट मलयुक्त सांडपाणी येत आहे. दूषित पाण्यामुळे कोल्हापूर येथे नदीपात्रात मासे मृत्युमुखी पडले होते. कोल्हापूरपासून मृत मासे वाहून येण्याबरोबरच दूषित पाण्याची तीव्रता वाढल्याने तेरवाड येथील नदीपात्रातील मासे मृत्युमुखी पडून बंधाऱ्याजवळ मृत माशांचा खच पडला होता. स्वाभिमानी कार्यकर्ते बंडू पाटील, विश्वास बालीघाटे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला माहिती देऊन पंचनामा करण्याची मागणी केली.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 05:38 IST

संबंधित बातम्या