Premium

कोल्हापुरात लाच स्वीकारताना आरोग्य विभागातील सहाय्यक अधीक्षकासह तिघांना रंगेहात पकडले

तक्रारदार यांचेकडून आरोपी  शिवम शिंदे याने लाच रक्कम स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

assistant superintendent of health department caught red handed while accepting bribes
(संग्रहित छायचित्र) फोटो सौजन्य : लोकसत्ता टीम

कोल्हापूर: सेवानिवृत्ती रजा मंजूर करण्यासाठी पंचवीस हजार रुपये बाकीची रक्कम स्वीकारल्याप्रकरणी कोल्हापुरातील आरोग्य विभागातील सहाय्यक अधीक्षकासह तिघांना रंगेहात करण्यात आले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मारुती परशुराम वरुटे (वय- ५० वर्षे, सहायक अधीक्षक,उप संचालक कार्यलय,आरोग्य सेवा कोल्हापूर, सद्या रा. पोतदार हायस्कूल जवळ. मुळ रा. कासारपुतळे, ता.राधानगरी, जि. कोल्हापूर) व विलास जिवनराव शिंदे, (वय – ५७  वर्षे, चालक ग्रामीण रुग्णालय पारगाव, ता.हातकणंगले), शिवम विलास शिंदे, (वय – २२ वर्षे,रा. सरकारी हॉस्पिटल कॉलनी पारगाव, ता.हातकणंगले मुळ रा. किणी, ता.हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी या संशयित आरोपींची नावे आहेत. तक्रारदार यांचे सेवानिवृत्त नंतर रजा रोखीकरण प्रस्ताव विना त्रुटी मंजूर करतो  म्हणून आरोपी मारुती वरुटे यांनी तक्रारदार यांचेकडे ३०००० रुपये मागणी करून तडजोडी अंती २५००० लाच रक्कम आरोपी चालक विलास शिंदे यांना घेण्यास सांगितली. तक्रारदार यांचेकडून आरोपी  शिवम शिंदे याने लाच रक्कम स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Three including assistant superintendent of health department caught red handed while accepting bribes in kolhapur zws