कोल्हापूर : मुंबईतून कोल्हापुरात येणाऱ्या कोयना एक्स्प्रेसनं तीन महिलांना चिरडल्याची घटना येथे घडली. या दुर्घटनेत दोन महिला आणि एका मुलीचा जागीच मृत्यू झाला. सकीना चंदन मुजावर (वय ४०), फिरदोस चंदन मुजावर (वय २२ ), अलिशा चंदन मुजावर (वय १० सर्व रा. भोने माळ इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत. मृतदेह मयताचा पती चंदन मुजावर यांच्या ताब्यात दिले असून याबाबत त्यांची तक्रार नसल्याचे शाहूपुरी पोलिसांनी शनिवारी सांगितले.

हेही वाचा – शक्तिपीठ महामार्गाची मागणी नसताना हजारो शेतकऱ्यांचे कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा शासनाचा निर्णय अनाकलनीय; खासदार शाहू महाराज छत्रपती

हेही वाचा – कोल्हापूर : सरसेनापती संताजी घोरपडे स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात; ऑगस्टमध्ये लोकार्पण, हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस कोल्हापुरातील मार्केट यार्डपासून छत्रपती शाहू महाराज रेल्वेस्थानकडे येत असताना तिची तिघींना जोराची धडक बसली. एक महिला रुळाच्या एका बाजूला तर दुसरी महिला आणि मुलगी रेल्वे रुळाच्या दुसऱ्या बाजूला फेकल्या गेल्या. तिघींच्या अंगावरुन रेल्वेचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.