साडेबारा लाख कोटी रुपये उत्पन्न असलेले उत्तर प्रदेशसारखे राज्य एकाच महिन्यात ३६ हजार कोटी रुपये कृषिकर्ज माफीचा निर्णय घेऊ शकते. मग देशात सर्वात प्रगत असणारे आणि साडेअठरा लाख कोटी रुपये उत्पन्न असणारे महाराष्ट्र राज्य शेतकऱ्यांची कर्जमाफी का करू शकत नाही. उद्योजकांची कर्जमाफी करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या शासनाला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत रस नाही. अशा बोलघेवडय़ा सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले.

Raj Thackeray
Heat Wave: राज ठाकरेंचं मुक्या प्राण्यांसाठी भावनिक आवाहन
New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
National Consumer Commission hearings,
राष्ट्रीय ग्राहक आयोगातील सर्वसुनावण्या १५ एप्रिलपासून ऑनलाईन!
Sarees given on ration by the women of Jawhar returned to the government
साडय़ा नको, शाश्वत रोजगार द्या! जव्हारच्या महिलांकडून रेशनवर दिलेल्या साडय़ा शासनाला परत

काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांच्या वतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यात संघर्षयात्रा काढण्यात आली आहे. आज या यात्रेचे आगमन कोल्हापुरात झाले. येथील दसरा चौकात सायंकाळी झालेल्या शेतकरी मेळाव्यात पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व वक्त्यांनी राज्य शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणावर सडकून टीका केली.

देशात सर्वाधिक आत्महत्या प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात घडत आहेत. तरीही राज्यातील सरकार जागे होण्याचे नाव घेत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकार संवेदनशून्य झाले आहे, असा आरोप करून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, उद्ध्वस्त झालेल्या बळिराजाला दिलासा देण्यासाठी संघर्षयात्रा सुरू केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी ३० हजार ५०० कोटी रुपयांची गरज आहे. ही कर्जमाफी राज्य शासन करू शकेल इतकी राज्यातील तिजोरी भक्कम आहे. तरीसुद्धा कर्जमाफीच्या अभ्यासाच्या नावाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाळाटाळ करण्याचे काम सुरू केले आहे. मंत्रालयात दाद मागण्यास येणाऱ्या शेतकऱ्याला न्याय देण्याऐवजी मारहाण करून तुरुंगात धाडण्यापर्यंत विद्यमान सरकार उन्मत्त झाले आहे. अशा सरकारच्या विरोधात संघर्ष अटळ आहे. संघर्ष यात्रेची नवी फेरी सुरू असून कोकणातही फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. कर्जमाफी होत नाही तोपर्यंत सरकारला स्वस्थ बसू दिले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यामुळे देशाची पतशिस्त बिघडेल इथपासून ते शेतकरी आळशी होईल अशा प्रकारची भाषा बँकांच्या अध्यक्षापासून विद्यमान सरकारच्या खासदारांनी सुरू केली आहे, असा उल्लेख करून चव्हाण म्हणाले, कर्जमाफीमुळे कोणते दोष निर्माण होतात, हे उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत कर्जमाफीची घोषणा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगण्याचे धाडस का केले नाही. तशी हिंमतच या मंडळींत नसल्याची टीकाही त्यांनी केली.

एकमेकांच्या खोडय़ा बंद करा : कदम

संघर्षयात्रेच्या निमित्ताने नेते एकत्र आले तरी स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये मतभेद कायम आहेत. या मुद्दय़ावर माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी कानपिचक्या दिल्या. खासदार धनंजय महाडीक यांच्या भाजप प्रवेशाच्या चच्रेचा अस्पष्ट उल्लेख करीत कदम यांनी त्यांना इकडे तिकडे करू नका, असा थेट सल्ला दिल्यावर सभास्थानी उपस्थित कार्यकत्रे शेतकऱ्यांनी थेट आरोळ्या ठोकण्यास सुरुवात केली. मंचावर असताना एकीची भाषा करायची आणि खाली उतरल्यावर एकमेकांच्या खोडय़ा सुरू करायच्या या पद्धतीला तिलांजली देण्याची गरज त्यांनी व्यक्त केल्यावर त्यालाही कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला.