scorecardresearch

तृप्ती देसाईंना कोल्हापुरात अटक

पोलिसांनी जमावबंदी आदेशाचा भंग करून आंदोलन केल्याप्रकरणी तृप्ती देसाई यांच्यासह १८ समर्थकांना अटक केली

Trupti desai , bigg boss 9 , Trupti Desai likely to enter upcoming season of Bigg Boss, Televsion, haji ali, Women leaders in maharashtra, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
तृप्ती देसाई (संग्रहित छायाचित्र)

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरात गाभारा प्रवेशावेळी मारहाण करणाऱ्या अन्य लोकांना अटक करण्याच्या मागणीसाठी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी शनिवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.
पोलिसांनी जमावबंदी आदेशाचा भंग करून आंदोलन केल्याप्रकरणी तृप्ती देसाई यांच्यासह १८ समर्थकांना अटक केली. पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांचे निलंबन करून अन्य लोकांना अटक करावी या मागणीसाठी पोलीस आयुक्तालयामध्ये आंदोलनाचा इशारा देसाई यांनी यावेळी दिला. याचप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मंदिरात गाभारा प्रवेशासाठी आलेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना १३ एप्रिल रोजी मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी श्रीपूजकांसह ७ जणांना अटक केली होती.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-06-2016 at 00:30 IST

संबंधित बातम्या