ट्रॅक्टरच्या धडकेत दोन शाळकरी विद्यार्थी ठार

कोल्हापूर-गगनबावडा रोड अपघात

कोल्हापूर-गगनबावडा रोडवर तिसंगी गावाजवळ मंगळवारी उसाने भरलेल्या ट्रॅक्टरशी  धडक होऊन झालेल्या अपघातात सायकलस्वार २ शाळकरी विद्यार्थी जागीच ठार झाले. अविनाश रंगराव पाटील, वय आणि पृथ्वीराज नेताजी सूर्यवंशी, (वय १५)  अशी  मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.
तिसंगी, ता. गगनबावडा येथील माध्यमिक विद्यालयातील दहावीत शिकणाऱ्या  विद्यार्थ्यांचा आज  निरोप समारंभ होता, त्यामुळे शाळा दुपारऐवजी सकाळी भरवण्यात आली होती. सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास शाळा सुटली. शाळेपासून सुमारे दीड किमी अंतरावर अविनाश व पृथ्वीराज यांचे घर आहे. दोघेही शाळेतून सायकलवरून परतत असताना घाडगे यांच्या घराजवळ हा अपघात झाला. समोरून येणाऱ्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टरने  धडक दिल्याने दोघेही उडून बाजूला जाऊन फेकले गेले. गगनबावडा पंचायत समितीचे माझी सदस्य बंकट थोडगे व इतरांनी अपघातात सापडलेल्या दोघांना कोल्हापूरच्या रुग्णालयामध्ये दाखल केले. वैद्यकीय सूत्रांनी तपासणी केल्यानंतर ते मृत्यू पावल्याचे सांगितले. अविनाश आणि पृथ्वीराज यांच्या मृत्यूमुळे तिसंगी गावावर शोककळा पसरली. पृथ्वीराजला दोन बहिणी आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कोल्हापूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Two school students killed in tractor accident