scorecardresearch

Premium

अवकाळी पावसाने कोल्हापूरला पुन्हा झोडपले

एका दिवसाच्या अंतराने पुन्हा एकदा अवकाळी पावसाने कोल्हापूर शहराला झोडपले.

Unseasonal rain lashed Kolhapur
कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

कोल्हापूर : एका दिवसाच्या अंतराने पुन्हा एकदा अवकाळी पावसाने कोल्हापूर शहराला झोडपले. ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस झाला होता. काल मात्र पावसाची उसंत होती. वातावरणात सतत बदल जाणवत आहे. आज सकाळपासून उन्हाची तिरीप जाणवत होती. दुपारी उकाडा वाढला. सायंकाळी चारनंतर पावसाला सुरुवात झाली. संपूर्ण शहराला पावसाने झोडपले. पावसामुळे फेरीविक्रेत्यांची धावपळ उडाली. जिल्ह्याच्या काही भागांत ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचे वृत्त आहे.

washim district yellow alert marathi news, yellow alert in washim marathi news
वाशीम : विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज; शेतकऱ्यांची चिंता वाढली
buldhana marathi news, buldhana mango trees marathi news
बुलढाणा : अवकाळी पावसाचा आंब्याच्या मोहोराला फटका; वीज पडून एकाचा मृत्यू
Heavy rain in Chandrapur city in the morning
चंद्रपूर : शहरात पहाटे मुसळधार पाऊस
Throw stones at a bus in Kolhapur
शालेय बसवर समाजकंटकांनी दगडफेक केल्याने कोल्हापुरात पुन्हा तणाव वाढीस

हेही वाचा – छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी

हेही वाचा – ‘बिद्री’ कारखान्याच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ- चंद्रकांत पाटील या मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

शेतीला फटका

मुसळधार पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. ज्वारी, हरभरा, मका, करडई याची काढणी असताना पाऊस आल्याने शेतकऱ्यांत चिंता निर्माण झाली आहे. उसासाठी मात्र हा पाऊस उपयुक्त ठरला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Unseasonal rain lashed kolhapur again ssb

First published on: 30-11-2023 at 19:12 IST

आजचा ई-पेपर : कोल्हापूर

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×