जयसिंगपूरची ऊर्मिला अर्जुनवाडकर अमेरिकेत नगरसेविका

या भागातील मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवत निवडून दिल्याने मी खूप आनंदी आहे.

ऊर्मिला अर्जुनवाडकर

कोल्हापूर : अमेरिकेतील न्यूजर्सी भागात झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत ‘होपवेल टाउनशिप’मध्ये जयसिंगपूरची कन्या ऊ र्मिला अर्जुनवाडकर निवडून आल्या आहेत. अर्जुनवाडकर उर्फ विवाहानंतरच्या ऊ र्मिला पुरंदरे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार एडवर्ड एम. जॅकोवस्की यांचा एक हजाराच्या मताधिक्यानी पराभव केला आहे. ‘होपवेल टाऊनशिप’च्या तीनशे वर्षांच्या इतिहासात भारतीय वंशाची पहिलीच नगरसेविका होण्याचा मानही ऊर्मिला यांनी पटकावला आहे. या यशाबद्दल बोलताना ऊर्मिला म्हणाल्या, की आपण वीस वर्षांहून अधिक काळ या भागात राहत आहोत. या भागातील मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवत निवडून दिल्याने मी खूप आनंदी आहे. मी त्यांची आभारी आहे. मी या भागाच्या मूल्यात्मक विकासासाठी सतत प्रयत्नशील राहील. उर्मिला यांचे शिक्षण जयसिंगपूर आणि सांगली मध्ये झाले. सध्या त्यांचे वास्तव्य होपवेल येथे  आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कोल्हापूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Urmila arjunwadkar of jaisingpur become corporator in america zws

Next Story
अनंत माने जन्मशताब्दी वर्षांस सुरुवात